‘साथ निभाना साथिया’ फेम देवोलीना भट्टाचार्जीने तिच्या मुलाचं नाव जाहीर केलं आहे. देवोलीनाने डिसेंबर महिन्यात मुलाला जन्म दिला होता. आता जवळपास दीड महिन्यांनी तिच्या मुलाचा नामकरण सोहळा पार पडला. तिने मुलाचं नाव खूपच खास ठेवलं आहे. पती शानवाज शेख व तिच्या लाडक्या मुलाबरोबरचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी १८ डिसेंबर २०२४ रोजी आई झाली. देवोलीनाने लग्नाच्या दोन वर्षांनी पती शानवाजबरोबर पहिल्या बाळाचं स्वागत केलं. देवोलीना व शानवाज यांचं आंतरधर्मीय लग्न होतं. या जोडप्याने बाळाचं नाव हटके ठेवलं आहे.

पहिल्या फोटोत देवोलीना कुशीत तिच्या लाडक्या मुलाला घेऊन बसली आहे, तर तिचा पती शानवाज शेजारी बसला आहे. दुसऱ्या फोटोत फक्त देवोलीना व तिचं बाळ आहे. देवोलीनाने दोन्ही फोटोत रेड हार्ट इमोजी वापरून बाळाचा चेहरा लपवला आहे. “आम्ही आमच्या कुटुंबातील सर्वात नवीन सदस्याचं स्वागत करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. आमचा जॉय, बंडल ऑफ हॅप्पीनेस!” असं कॅप्शन देवोलीनाने दिलं आहे.

पाहा पोस्ट-

दरम्यान, देवोलीना भट्टाचार्जी व जिम ट्रेनर शानवाज शेख काही वर्षे रिलेशनशिपमध्ये होते, त्यानंतर या दोघांनी १४ डिसेंबर २०२२ रोजी लग्न केलं. त्यांनी नोंदणी पद्धतीने लोणावळ्यात लग्न केलं होतं. या लग्नात दोघांचे कुटुंबीय व काही जवळचे लोक उपस्थित होते. लग्नानंतर दीड वर्षांनी या दोघांनी ते आई-बाबा होणार असल्याची आनंदाची बातमी दिली होती. त्यानंतर डिसेंबर २०२४ मध्ये त्यांच्या मुलाचा जन्म झाला.

देवोलीनाच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास तिने २०११ मध्ये ‘सवांरे सबके सपने प्रीतो’ या शोमधून करिअरला सुरुवात केली. मग ‘साथ निभाना साथिया’ मध्ये तिने जिया माणेकला गोपीच्या भूमिकेत रिप्लेस केलं. या मालिकेमुळे देवोलीना घराघरात पोहोचली. नंतर देवोलीना ‘बिग बॉस’मध्ये सहभागी झाली होती. तिने ‘लाल इश्क’, ‘साथ निभाना साथिया २’ आणि ‘दिल दियां गल्लां’, ‘छठी मैय्या की बिटिया’ या शोमध्ये काम केलं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sath nibhana saathiya fame actress devoleena bhattacharjee reveals baby name hrc