बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने रविवारी (६ नोव्हेंबर) गोंडस मुलीला जन्म दिला. आलिया पाठोपाठ आणखी एक अभिनेत्री आई झाली आहे. ‘साथ निभाना साथिया’ फेम रुचा हसबनीसला पुत्ररत्नाची प्राप्ती झाली आहे. रुचाने सोशल मीडियावर बाळाचा फोटो शेअर करत ही गोड बातमी चाहत्यांना दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रुचाने तिच्या ऑफिशियल इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन नवजात बाळाच्या पायांचा फोटो शेअर केला आहे. ‘रुहीचा साथीदार इथे आहे आणि तो मुलगा आहे’, असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे. रुचाच्या या फोटोवर चाहत्यांनी कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा >> “अपूर्वा नेमळेकर घरात फक्त अभिनय…”, ‘बिग बॉस’मधून बाहेर पडलेल्या योगेश जाधवचा खुलासा

हेही वाचा >> आलिया भट्टनंतर बिपाशा बासूही गुडन्यूज देण्याच्या तयारीत, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

छोट्या पडद्यावरील ‘साथ निभाना साथिया’ मालिकेतून रुचा घराघरात पोहोचली. या मालिकेत तिने साकारलेल्या राशी या पात्रामुळे तिला लोकप्रियता मिळाली. २०१५ मध्ये रुचाने पती राहुल जगदाळेशी विवाह केला. त्यांना एक मुलगी आहे. २०१९ साली रुचाने गोंडस मुलीला जन्म दिला. तिचं नाव ‘रुही’ असं आहे.

रुचा गेला बराच काळ कलाविश्वापासून दूर आहे. परंतु असं असलं तरीही ती सोशल मीडियावरुन चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. रुचाला पुत्ररत्नाची प्राप्ती झाल्याने चाहतेही आनंदी आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sath nibhana sathiya fame actress rucha hasabnis blessed with a baby boy kak