छोट्या पडद्यावरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. या रहस्यमय मालिकेत हळू हळू अनेक गोष्टींचे खुलासे होत आहेत. रुपालीचा खरा चेहरा लवकरच सगळ्यांसमोर येणार आहे. याबरोबरच नेत्राला ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ असं का म्हटलं जातं,याचा उलगडाही मालिकेत होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका सध्या रंजक वळणावर आहे. दिव्यशक्ती प्राप्त असलेल्या नेत्रामुळे रुपालीची कट कारस्थाने सगळ्यांसमोर येणार आहेत. रूपालीने ग्रंथातील रहस्य समजावून घ्यायला सुरुवात केल्यापासून तिच्या मार्गात अनेक अडथळे येत आहेत.नेत्राला हरवणं सोपं नाही, हे या ग्रंथातून रुपालीला कळलं आहे. तिच्याकडे असलेल्या दिव्यशक्तीमुळे ती आपला प्रत्येक डाव उधळून लावणार आहे. ग्रंथात लिहिलेल्या सातव्या मुलीची सातवी मुलगी या ओळीचा अर्थ आणि नावमागचा उलगडा रूपालीला झाला आहे. त्यामुळे रूपालीला आपली हार स्पष्ट दिसत आहे.

हेही वाचा>> ‘व्हॅलेंटाईन डे’ला गायीला मिठी मारा; केंद्राच्या सल्ल्यानंतर उर्फी जावेदने शेअर केला भाजपा नेत्याचा ‘तो’ व्हिडीओ, म्हणाली…

रुपालीबरोबरच आता सातव्या मुलीची सातवी मुलगी या नावामागील खरा अर्थ प्रेक्षकांनाही कळणार आहे. नेत्राची आई ही सातवी मुलगी आणि नेत्रा तिची सातवी मुलगी हा या मालिकेच्या नावामागचा एक अर्थ प्रेक्षकांना माहित आहे.परंतु या नावामागचं रहस्य अद्याप गुलदस्त्यात आहे. याचा उलगडा रविवारी १२ फेब्रुवारीला मालिकेच्या महाएपिसोडमध्ये होणार आहे. रविवारी दुपारी १ आणि रात्री ८ वाजता प्रेक्षकांना या मालिकेचा महाएपिसोड पाहता येणार आहे.

हेही वाचा>> Video: प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्यासह अक्षय कुमारने केला भांगडा डान्स, व्हिडीओ व्हायरल

सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेत अभिनेत्री तितीक्षा तावडे नेत्राची भूमिका साकारत आहे. अभिनेता अजिंक्य ननावरे अद्वैत राजाध्यक्षाच्या भूमिकेत आहे. तर ऐश्वर्या नारकर रुपाली राजाध्यक्ष ही भूमिका साकारत आहेत. मुग्धा गोडबोले, अश्विनी मुकादम हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Satvya mlichi satvi mulgi reason behind the name titeeksha tawade serial update kak