झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. गेली जवळपास दीड वर्षे ही मालिका चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या मालिकेतील कलाकारांचं ऑन स्क्रीन बॉण्डिंग तर प्रेक्षक टीव्हीवर पाहतच असतात; पण त्यांचं ऑफ स्क्रीन बॉण्डिंग खूप खास आहे.
तितीक्षा तावडे, ऐश्वर्या नारकर, अमृता रावराणे, एकता या अभिनेत्री सेटवर अनेकदा धमाल मस्ती करताना दिसतात. मेकअप रूममध्ये डान्स व्हिडीओज, रील्स शेअर करीत त्या चाहत्यांचं मनोरंजन करताना दिसतात. अभिनेत्रींच्या या रील्स अनेकदा चर्चेत असतात, अशातच आता या कलाकारांचा एक मजेशीर व्हिडीओ एकतानं शेअर केला आहे. सध्या इंटरनेटवर एका कार्टूनरूपी चेटकिणीचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. याचं डायलॉगवर आता ऐश्वर्या नारकर, तितीक्षा तावडे, एकता व अमृता यांनी व्हिडीओ बनवला आहे. या व्हिडीओत ऐश्वर्या नारकर आणि अमृता अभिनय करतायत; तर एकता आणि तितीक्षा त्यांच्यासाठी डायलॉग बोलताना दिसतायत.
अभिनेत्रींचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. “तुम्हीसुद्धा लिली, दीदी किंवा परी आहात का?” असं कॅप्शन एकतानं या व्हिडीओला दिली आहे. अभिनेत्रींच्या या व्हिडीओवर चाहत्यांच्या भरभरून कमेंट्स आल्या आहेत.
एका चाहत्यानं कमेंट करीत लिहिलं, “केतकीकाकू फूल फॉर्ममध्ये आहेत.” तर दुसऱ्यानं लिहिलं, “किती मजा करता तुम्ही लोक.”
हेही वाचा… गुड न्यूज दिल्यानंतर पहिल्यांदाच दिसला दीपिका पदुकोणचा बेबी बंप; अभिनेत्रीचा अनसीन फोटो व्हायरल
एका नेटकऱ्यानं मालिकेविषयी राग व्यक्त करीत कमेंट केली आहे. “तुमच्या हावभावांसारखीच तुमची मालिका झाली आहे. आधी आम्ही न चुकता, तुमची मालिका पाहायचो; आता नाही पाहत. चांगल्या मालिकेची तुम्ही माती केली. आटोपतं घ्या आता.” असं एका नेटकऱ्यानं कमेंट करीत लिहिलं.
दरम्यान, ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेमध्ये तितीक्षा तावडे नायिकेची भूमिका साकारत आहे; तर ऐश्वर्या नारकर या खलनायिकेच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळतायत. त्याव्यतिरिक्त या मालिकेत अजिंक्य ननावरे, श्वेता मेहेंदळे, राहुल मेहेंदळे, जयंत घाटे यांच्याही निर्णायक भूमिका आहेत.