‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका छोट्या पडद्यावर चांगलीच लोकप्रिय आहे. २०२२ मध्ये ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. गेली जवळपास दीड वर्षे ही मालिका चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. यामधील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. तितीक्षा तावडे, अजिंक्य ननावरे, ऐश्वर्या नारकर, सुरुची अडारकर यांच्या या मालिकेत महत्त्वाच्या भूमिका आहेत.

मालिकेत तितीक्षाने नेत्रा, तर ऐश्वर्या नारकर यांनी रुपाली हे पात्र साकारलं आहे. रुपाली हे खलनायिकेचं पात्र असल्याने ती नेहमीच नेत्रा विरोधात कट रचत असल्याचं मालिकेत पाहायला मिळतं. परंतु, प्रत्यक्षात या मालिकेतील सगळ्याच अभिनेत्रींमध्ये खूप सुंदर असं ऑफस्क्रीन बॉण्डिंग आहे. या सगळ्या जणी मिळून नुकत्याच एका व्हायरल गुजराती गाण्यावर थिरकल्या आहेत.

Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Punha Kartvya Aahe
Video: “हिला अन्न-पाणी…”, आईच्या विरोधात जाऊन आकाश वसुंधराची साथ देणार; नेटकरी म्हणाले, “नवरा-बायकोमधील नातं…”
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
Marathi actress Kishori Shahane Dance on varun Dhawan song video goes viral
Video: “लय भारी ताई”, किशोरी शहाणेंचा वरुण धवनच्या गाण्यावर एनर्जेटिक डान्स, नेटकरी करतायत कौतुक
Chhoti Tara Tadoba , Tadoba Chhoti Tara Tiger Calf Video, Chhoti Tara Tiger,
VIDEO : ‘तिने’ सहावेळा मातृत्त्वाचा अनुभव घेतला, पण आता…
thipkyanchi rangoli fame Namrata Pradhan sister gunjan Pradhan will get marry
‘ठिपक्यांची रांगोळी’ फेम अभिनेत्रीच्या बहिणीचं ठरलं लग्न, आनंदाची बातमी देत म्हणाली…
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “डॅडीसारखा देवमाणूस…”, शत्रूचे स्वप्न पूर्ण होणार अन् तेजूचे आयुष्य पालटणार; सूर्याने केली बहिणीची पाठवणी, पाहा प्रोमो

हेही वाचा : IPL 2024 : “हार्दिक पंड्याला मिळणारी वागणूक…”, पुष्कर जोगने शेअर केला ‘तो’ व्हिडीओ; म्हणाला, “तो भारतीय संघाचं…”

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ फेम एकताने तिच्या इन्स्टाग्रामवरून शेअर केलेला एक व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. ‘व्हॅनिला आइस्क्रीम’ चित्रपटातील ‘हरखता मलकता’ (Harakhta Malakta) या गुजराती गाण्यावर सगळ्या अभिनेत्री थिरकत असल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. एकतासह तितीक्षा तावडे, अमृता रावराणे, ऐश्वर्या नारकर यांची झलक या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : “लघाटे आंबेवाले…”, मुग्धा-प्रथमेश गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पुन्हा सुरू करणार आंबा व्यवसाय; म्हणाले, “अस्स्ल रत्नागिरी…”

दरम्यान, या अभिनेत्रींच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी “आम्हाला या गाण्याचा अर्थ पण सांगा”, “किती गोड व्हिडीओ आहे”, “मस्तच”, “एकदम सरस” अशा कमेंट्स केल्या आहेत.

Story img Loader