‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. अभिनेत्री तितीक्षा तावडे व अभिनेता अजिंक्य ननावरे यांची प्रमुख भूमिका असलेली ही मालिका वेगळ्या कथानकामुळे प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. नेत्रा व अद्वैतची ही जोडी प्रेक्षकांची लाडकी झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तसंच ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेत अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी साकारलेली खलनायिका रुपालीवर देखील प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. ऑनस्क्रीन नेत्रा व रुपाली या एकमेकांच्या विरोधात असल्या तरी ऑफस्क्रीन या दोघींचं बॉन्डिंग खूप चांगली आहे. दोघी नेहमी फोटो, व्हिडीओ एकत्र काढत असतात. नुकतंच दोघींनी चाहत्यांना अनोख्या अंदाजात होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा – बॉक्स ऑफिसवर ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपटापेक्षा ‘मडगांव एक्सप्रेस’ सुपरफास्ट, दोन दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी

“हॅप्पी होळी” असं कॅप्शन लिहित तितीक्षा तावडेने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत, तितीक्षा व ऐश्वर्या नारकर मजेशीर अंदाजात चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत. दोघींचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे.

हेही वाचा – ‘नवरा माझा नवसाचा’ चित्रपटात प्रशांत दामले झळकणार होते ‘या’ भूमिकेत, पण…; जयवंत वाडकरांनी सांगितला किस्सा

तितीक्षा व ऐश्वर्या नारकरांच्या या व्हिडीओवर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी प्रतिक्रिया देते होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “कुठून शोधून काढता”, “शुभेच्छा देण्याची काय भारी स्टाइल आहे रे बाबा… हॅप्पी होळी”, “लय भारी”, अशा अनेक प्रतिक्रिया चाहत्यांनी या व्हिडीओवर दिल्या आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Satvya mulichi satavi mulgi fame actress titeeksha tawde aishwarya narkar share funny video and wish happy holi to fans pps