टीव्हीवर दररोज प्रदर्शित होणाऱ्या मालिका प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करत असतात. काही मालिका या प्रेक्षकांच्या लाडक्या असतात, तर काही मालिका वेगळ्या कथानकामुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत असतात.

आता सोशल मीडियामुळे प्रेक्षक त्यांना एखाद्या विषयावर काय वाटते हे सहज सांगू शकतात. त्याचप्रमाणे मालिकांवरदेखील व्यक्त होताना दिसतात. आता ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी'( satvya mulichi satavi mulgi) या मालिकेचा एक व्हिडीओ झी मराठीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यावर नेटकऱ्यांनी कमेंट करत आपले मत मांडल्याचे पाहायला मिळत आहे.

Aishwarya Narkar
“ही विकृती…”, सोशल मीडियावरील ट्रोलिंगबाबत ऐश्वर्या नारकर म्हणाल्या, “मी ब्लॉक केलं म्हणून तो माणूस…”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Titeeksha Tawade
Video : ‘लव्हयापा’ म्हणत तितीक्षा तावडेने शेअर केला व्हिडीओ; एकता व ऐश्वर्या नारकरांनी दिली साथ, पाहा व्हिडीओ
Aishwarya And Avinash Narkar dance video
नारकर जोडप्याचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! Video पाहून मराठी अभिनेत्री म्हणते, “हा ग्रुप कसा जॉईन करायचा…”
Sakhi Gokhale and suvrat joshi dance on shahrukh khan lutt putt gaya song
Video: सखी गोखले-सुव्रत जोशीचा पहाटे २ वाजता शाहरुख खानच्या ‘या’ गाण्यावर भन्नाट डान्स, पाहा व्हिडीओ
richa chadha and ali fazal What language speak with daughter
रिचा चड्ढा-अली फैजल चिमुकल्या लेकीशी ‘असा’ साधतात संवाद, तिच्यासाठी गातात ‘हे’ गाणं
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “मैदानच मोकळं…”, सूर्याची बहीण संकटात सापडणार; प्रोमो पाहिल्यानंतर नेटकरी म्हणाले, “चुकीचा संदेश…”
Jitendra Awhad, Mumbra Marathi case, Mumbra ,
मुंब्रा मराठी प्रकरणावर आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “लहान मुलांच्या वादाला…”

‘झी मराठी’ वाहिनीने इन्स्टाग्रामच्या अधिकृत अकाउंटवर ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेतील एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये शतग्रीव हे पात्र नेत्रा आणि तिच्या कुटुंबीयांना फसवून त्यांच्या घरात प्रवेश करणार असल्याचे पाहायला मिळत आहे.

व्हिडीओच्या सुरुवातीला, अद्वैतची काकू नेत्राला विचारते, “हे सगळं काय चाललं आहे? तुला हे कसं कळत नाही की रुपाली आहे.” त्यानंतर मैथिलीच्या रुपात असलेला शतग्रीव मनातल्या मनात, “या कुटुंबाला माझ्यामुळे त्रास झाला तरीही ते मला आधार द्यायचा प्रयत्न करत आहे.” असे म्हणताना दिसत आहे. ही गोष्ट इंद्रायणी आत्याला कळते. ती म्हणते की, ही मैथिली आहे, रुपालीसारखी वाईट नाही. त्यानंतर नेत्रा घरच्यांना समजावते की यांना आजच्या दिवस घरी राहू द्या. त्यानंतर मैथिली मनातल्या मनात म्हणते की, त्रिनयना देवीची लेक फसली. शतग्रीव विरोचकासारखा कमजोर नाही. आता या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट करत मालिकेबद्दल आपले मत मांडले आहे.

झी मराठी इन्स्टाग्राम

काय म्हणाले नेटकरी?

सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेतील हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी यावर कमेंट केल्या आहेत. एका नेटकऱ्य़ाने म्हटले, “या त्रिनयनाच्या मुली सारख्याच फसतात”, असे म्हटले आहे. दुसऱ्या एका नेटकऱ्याने म्हटले, “बंद करा मालिका.” आणखी एका नेटकऱ्याने म्हटले आहे की, यांना काम नाही म्हणून काहीही दाखवतात. एका नेटकऱ्याने म्हटले, “हिला एवढंपण कळत नाही ती बंगाली आहे, तर मराठीत कशी बोलेल” अशा प्रकारच्या कमेंट करत नेटकऱ्यांनी मालिकेला ट्रोल केले आहे.

हेही वाचा: “माझ्या आईसाठी त्याने…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाला अक्षय कुमारने केलेली मदत; म्हणाला, ” तो क्षण मी कधीच विसरणार नाही…”

हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “त्रिनयनाच्या लेकींचा गैरसमज होणार, त्याचाच फायदा शतग्रीव घेणार…!”, असे म्हटले आहे.

दरम्यान, मालिकेत विरोचकाचा नाश झाला असून नेत्राचे कुटुंब सामान्य माणसाप्रमाणे आयुष्य जगत होते. मात्र, आता ???शतग्रीवने या पात्राने त्यांच्या आयुष्यात एन्ट्री केली आहे. त्याच्या येण्याने मालिकेत कोणते नवे वळण येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Story img Loader