‘झी मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिका आहे. सप्टेंबर २०२२ रोजी सुरू झालेल्या या मालिकेने आता लोकप्रियतेची एक वेगळी उंची गाठली आहे. मालिकेतील प्रत्येक कलाकारांनी आपआपले पात्र उत्तमरित्या निभावलं आहे. त्यामुळे प्रेक्षकांनाही ती पात्र आपलीशी वाटतं आहेत. मालिकेने आता ५०० भागांचा टप्पा गाठला असून हा खास क्षण जोरदार साजरा करण्यात आला. याचे फोटो, व्हिडीओ व्हायरल होतं आहेत.

अभिनेत्री तितीक्षा तावडे व अभिनेता अजिंक्य ननावरे यांची प्रमुख भूमिका असलेली ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका वेगळ्या कथानकामुळे प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे. या मालिकेतील नायिका असो किंवा खलनायिका प्रत्येक पात्रावर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहे. आज मालिकेने ५०० भागांचा टप्पा पूर्ण केल्यानिमित्ताने सेलिब्रेशन करण्यात आलं. यावेळी मालिकेतील कलाकार मंडळींसह संपूर्ण टीम उपस्थितीत होती.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा – Video: नवखी चाहूल इवलं पाऊल….; कार्तिकी गायकवाडला मुलगी होणार की मुलगा? डोहाळे जेवणाचा Unseen व्हिडीओ समोर

दोन मोठे केक कापून ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेच्या टीमने हा खास क्षण साजरा केला. यावेळी सगळ्या टीमला खास भेटवस्तू देण्यात आली. याशिवाय तुषार देवलने मालिकेचं शीर्षक गीत गायलं. याचा व्हिडीओ अभिनेत्री एकता डांगर हिने शेअर केला आहे.

हेही वाचा – ‘फुलाला सुगंध मातीचा’ फेम अभिनेत्री झळकणार ‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत, साकारणार महत्त्वाची भूमिका

दरम्यान, ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत तितीक्षा, अजिंक्य व्यतिरिक्त ऐश्वर्या नारकर, सुरुची अडारकर, श्वेता मेहेंदळे, राहुल मेहेंदळे, मुग्धा गोडबोले-रानडे, रजनी वेलणकर, जान्हवी किल्लेकर, अमृता रावराणे, अनिरुद्ध देवधर, प्रशांत केणी, असे अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

Story img Loader