झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. अभिनेत्री तितीक्षा तावडे या मालिकेत प्रमुख नायिकेची भूमिका साकारत आहे. या मालिकेत ती नैत्रा या भूमिकेत आहे. नुकतंच तिने या मालिकेतील अनुभव मुलाखतीदरम्यान शेअर केले.
तितीक्षाने ‘सकाळ पॉडकास्ट’ला मुलाखत दिली. ‘सरस्वती’ मालिकेतून तितीक्षाने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. या मालिकेचा अनुभव तिने या मुलाखतीत सांगितला. ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत नैत्राची देवीवर श्रद्धा आहे. तसंच खऱ्या आयुष्यात तुझी कोणावर श्रद्धा आहे, असा प्रश्न तितीक्षाला विचारण्यात आला.
हेही वाचा >> “माझ्या लग्नात…” हार्दिक जोशीसह विवाहबंधनात अडकल्यानंतर अक्षया देवधरने शेअर केली खास पोस्ट
हेही वाचा >>हास्यजत्रा फेम गौरव मोरेने शेअर केला एअरपोर्टवरील फोटो, चाहते कमेंट करत म्हणतात “शाहरुख खानच्या पठाण…”
तितीक्षा यावर उत्तर देत म्हणाली, “मी स्वामी समर्थ यांची पूजा करते. सात-आठ वर्षांपूर्वी आम्ही अक्कलकोटला गेलो होतो. त्याआधी स्वामी समर्थ हे आम्ही फक्त अनेकांच्या तोंडी ऐकलं होतं. पण अक्कलकोटला गेल्यानंतर ते माझं श्रद्धास्थानच झालं. सरस्वती ही माझी पहिली मालिका. स्वामींच्या मठात असतानाच या मालिकेसाठी मला पहिला कॉल आला होता”.
हेही वाचा >> “…तेव्हा मी १८ तास जेवण केलं नव्हतं” ‘काश्मीर फाइल्स’ चित्रपटातील ‘तो’ प्रसंग सांगताना अनुपम खेर भावूक
तितीक्षा ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. सरस्वतीबरोबरच ती तू अशी जवळी राहा मालिकेतही मुख्य भूमिकेत होती. तापसी पन्नूच्या शाबास मिथू या चित्रपटातही तितीक्षा झळकली होती.