‘झी मराठी’ वाहिनीवरील सध्या लोकप्रिय असणाऱ्या मालिकांपैकी एक म्हणजे ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिका. या मालिकेला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेतील नवनवीन ट्विस्टने प्रेक्षकांना चांगलंच खिळवून ठेवलं आहे. मालिकेतील पात्र आता घरोघरी पोहोचली आहेत. अशा या लोकप्रिय मालिकेतील एका अभिनेत्रीने आलिशान नवी गाडी खरेदी केल्याचं समोर आलं आहे. याबाबत तिने स्वतः सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामुळे ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेतील ही अभिनेत्री सध्या चर्चेत आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेतील अभिनेत्री जितक्या त्यांच्या कामामुळे चर्चेत असतात. तितक्यात त्या सोशल मीडियावर पोस्टमुळे चर्चेत असतात. या मालिकेतील अभिनेत्रींचे डान्स व्हिडीओ कायम व्हायरल होतं असतात. पण या व्हिडीओमध्ये सहसा एक अभिनेत्री दिसत नाही. ती म्हणजे अभिनेत्री श्वेता मेहेंदळे. याच श्वेताने स्वतःच्या वाढदिवसानिमित्ताने आलिशान गाडी खरेदी केली आहे. याचा व्हिडीओ तिने नुकताच सोशल मीडियावर शेअर केला आहे.

हेही वाचा – Bigg Boss 18 : ‘बिग बॉस’च्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं, शोच्या पहिल्याच दिवशी टॉप-२ फायनलिस्टचा केला खुलासा, कोण आहेत? जाणून घ्या…

“माझ्या वाढदिवसाची ही भेटवस्तू आहे. कृपया शुमीचं स्वागत करा. तुमचं प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आभारी आहे”, असं कॅप्शन लिहित श्वेता मेहेंदळेने नव्या गाडीचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिच्याबरोबर पती राहुल मेहेंदळे देखील पाहायला मिळत आहेत. त्यानंतर श्वेताचं कुटुंब गाडीची पूजा करताना दिसत आहे.

हेही वाचा – “हे खूप प्रेम, हसणं आणि…”, प्रिया बापटने लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने लिहिली खास पोस्ट, म्हणाली…

हेही वाचा – Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंची शोमध्ये एन्ट्री, सलमान खानला हसू झालं अनावर, घरात राहणार गाढवाबरोबर! पाहा प्रोमो

श्वेताने शेअर केलेला व्हिडीओ पाहून इतर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री तितीक्षा तावडे, ऐश्वर्या नारकर, उदय टिकेकर, सुकन्या मोने, रुतुजा देशमुख, यश प्रधान अशा अनेक कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

दरम्यान, ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेत श्वेता मेहेंदळेने इंद्राणी राजाध्यक्षची भूमिका साकारली आहे. याच मालिकेतील तिचे पती राहुल मेहेंदळे देखील आहेत. त्यांनी शेखर राजाध्यक्षची भूमिका निभावली आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Satvya mulichi satvi mulgi fame shweta mehendale bought new car for birthday pps