Titeeksha Tawde And Siddharth Bodke Engagement: फेब्रुवारीच्या महिन्याच्या सुरुवातीलाच ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेतील अद्वैत म्हणजे अभिनेता अजिंक्य ननावरे लग्नबंधनात अडकला. अभिनेत्री शिवानी सुर्वेबरोबर अजिंक्यने लग्न केलं. त्यानंतर आता ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेतील नेत्रा लवकरच बोहल्यावर चढणार आहे. अभिनेता सिद्धार्थ बोडकेबरोबर ती लग्नगाठ बांधणार आहे. आज दोघांचा साखरपुडा पार पडला. याचा पहिला-वहिला व्हिडीओ नुकताच समोर आला आहे.

अभिनेत्री तिताक्षा तावडेने साखरपुड्याचा पहिला व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. “माझ्या जिवलग मित्राबरोबर आता कायमची…” असं कॅप्शन देत तिताक्षाने साखरपुड्याचा व्हिडीओ चाहत्यांसाठी शेअर केला आहे. हा व्हिडीओ अवघ्या काही मिनिटांत सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हेही वाचा – Video : तितीक्षा-सिद्धार्थची लगीनघाई! हळदी समारंभात नवरदेवाचा वडिलांबरोबर भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल

या व्हिडीओत, फुलांची सजावट, अभिनेत्याची तयारी आणि त्यानंतर एकमेकांना अंगठी घालण्याचा क्षण पाहायला मिळत आहे. पंडित अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांची लेक अभिनेत्री अनघा अतुलच्या एका कृतीने मात्र सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अनघा ही सिद्धार्थ खूप चांगली मैत्रीण आहे. या व्हिडीओत अनघा मजेशीर अंदाजात तावडे व बोडके कुटुंबाला जेवण्यासाठी बोलवताना दिसत आहे.

हेही वाचा – अनंत अंबानी-राधिका मर्चेंट यांच्या प्री-वेडिंग कार्यक्रमात रिहाना, अरिजित सिंहसह ‘हे’ मराठी गायक करणार परफॉर्मन्स, यादी आली समोर

तितीक्षाने शेअर केलेल्या साखरपुड्याच्या या पहिल्या व्हिडीओवर कलाकार मंडळीसह चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, साखरपुड्यासाठी तितीक्षा व सिद्धार्थने खास लूक केला होता. अभिनेत्रीने फिकट जांभळ्या रंगाची डिझाइनर साडी नेसली होती. तर, अभिनेत्याने ऑफ व्हाइट रंगाची शेरवानी परिधान केली होती.