‘सावळ्याची जणू सावली'(Savlyachi Janu Savli) या मालिकेत सतत ट्विस्ट येताना दिसतात. सावलीच्या आयुष्यात कायम चढ-उतार सुरू असल्याचे पाहायला मिळते. कधी तिला भैरवीचा त्रास सहन करावा लागतो तर कधी कुटुंबासाठी, तिच्या भावासाठी सतत अपमानसुद्धा सहन करताना दिसते. आता मात्र सावली पुन्हा एकदा द्विधा मनस्थितीत सापडल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भैरवीला दिलेले वचन कसे पूर्ण करणार?

झी मराठी वाहिनीने ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की सावली व सारंगच्या लग्नाचे रिसेप्शन आहे. तिथे ताराच्या गाण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे. मेहेंदळे कुटुबांची सून असलेली ऐश्वर्या म्हणते की आतापर्यंत ज्या कार्यक्रमाची तुम्ही वाट पाहत होता. तो आता सुरू करूयात. जिला स्वर्गीय सुरांची देणगी लाभली आहे ती तारा वझे आता आपल्यासमोर येत आहे. तारा पुढे गाणे म्हणण्यासाठी जाते. पण ती गाणे सुरू करत नाही. हे पाहून तिलोत्तमा ऐश्वर्याला म्हणते की तिला सांग सुरू करायला. यादरम्यान,तारा, भैरवी व सावली या चिंतेत दिसत आहे. सावली तिच्या जागेवरून उठत असते तितक्यात तिची मोठी जाऊ तिला म्हणते, “सावली अगं बस. आता कार्यक्रम सुरू होईल.” सर्वजण कार्यक्रम सुरू होण्याची वाट बघत आहेत. टाळ्या वाजवत ताराला प्रोत्साहन देत असल्याचे प्रोमोमध्ये दिसत आहे.

इन्स्टाग्राम

हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “सावली भैरवीला दिलेलं वचन कसं करणार पूर्ण?”, अशी कॅप्शन दिली आहे.

सावळ्याची जणू सावली मालिकेत काही दिवसांपूर्वीच सारंग व सावलीचे त्यांच्या मर्जीविरुद्ध लग्न झाले आहे. तिलोत्तमाचा बदला घेण्यासाठी जगन्नाथने त्या दोघांचे लग्न लावून दिले. मात्र, सौंदर्याचा अहंकार असलेल्या तिलोत्तमाला हे लग्न मान्य नाही. तिने सावलीला तिची सून मानण्यास नकार दिला आहे. आता फक्त सावलीचा स्वीकार केला आहे, असे जगाला दाखविण्यासाठी ते कार्यक्रम करत असल्याचे पाहायला मिळत आहे. दुसरीकडे, सावली लहानपणापासून ताराचा आवाज बनली आहे. सावली गाते मात्र लोकांना वाटते की तारा गात आहे. भैरवी ही लोकप्रिय गायिका होती. त्यामुळे तिच्या घराची परंपरा ताराने पुढे चालवावी असे तिला वाटत होते. मात्र, ताराला गाता येत नाही. त्यामुळे गरीब असलेल्या सावलीचा आवाज भैरवीने तारासाठी वर्षानुवर्षे वापरला आहे. त्याबदल्यात भैरवी सावलीला तिच्या भावाच्या औषोधोपचारासाठी पैसे देते. आता सावलीने आपले कर्तव्य पूर्ण करण्यासाठी लग्नानंतरही तारासाठी गाण्याचे वचन दिले आहे.

हेही वाचा: ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चन दुसऱ्यांदा आई-बाबा होणार? रितेश देशमुखच्या ‘त्या’ प्रश्नावर अभिनेता म्हणाला…

आता सासरच्या मंडळींसमोर तारासाठी गाण्याचे तिचे वचन सावली कसे पूर्ण करणार, तारा सर्वांसमोर गाणे सादर करू शकणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Savali in ambivalence hiw will she fulfill her promise to bhairavi watch promo savlyachi janu savlai watch promo nsp