सध्या सर्वत्र ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करत बरेच रेकॉर्ड मोडताना दिसत आहे. अवघ्या चार दिवसात जागतिक स्तरावर ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटाने ८०० कोटींहून अधिक गल्ला जमवला आहे. तर भारतात ५३१ कोटींचा व्यवसाय केला आहे. ८ डिसेंबरला, रविवारी फक्त एका दिवसांत या चित्रपटाने १४२ कोटींची कमाई केली आहे. ‘पुष्पा २: द रुल’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘पुष्पा २: द रुल’ या चित्रपटातील गाण्यांनी अक्षरशः वेड लावलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर सर्वसामान्यांसह कलाकार मंडळी ‘पुष्पा २’ चित्रपटातील गाण्यावर थिरकताना दिसत आहे. अशातच ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेतील अभिनेत्री प्राप्ती रेडकरच्या डान्स व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.

हेही वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकारांचं नवं नाटक लवकरच रंगभूमीवर; नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकरसह दिसतील ‘हे’ कलाकार

अभिनेत्री प्राप्ती रेडकरने हा डान्स व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये प्राप्ती ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटातील ‘अंगारो’ गाण्यावर जबरदस्त डान्स करताना पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये प्राप्ती लोकप्रिय इन्फ्लुएन्सर तन्मय पाटेकरबरोबर डान्स करताना दिसत आहे.

हेही वाचा – ‘ठिपक्यांची रांगोळी’ फेम अभिनेत्रीच्या बहिणीचं ठरलं लग्न, आनंदाची बातमी देत म्हणाली…

प्राप्तीच्या डान्स व्हिडीओवर इतर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. “कडक”, “खूप छान”, “एकदम मस्त”, “तुमची जोडी एक नंबर आहे”, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांच्या उमटल्या आहेत.

हेही वाचा – स्पृहा जोशी होणार मावशी, बहिणीच्या डोहाळे जेवणाचे फोटो केले शेअर, माफी मागत म्हणाली…

दरम्यान, प्राप्ती रेडकरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, काही महिन्यांपूर्वी तिची ‘सावळ्याची जणू सावली’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली. ‘झी मराठी वाहिनी’वरील या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या मालिकेत प्राप्तीने साकारलेली सावली प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. याआधी प्राप्ती ‘कलर्स मराठी’वरील ‘काव्यांजली’ मालिकेत झळकली होती. या मालिकेत तिने अंजलीची भूमिका साकारली होती.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Savalyachi janu savali fame prapti redkar dance on angaaron song of pushpa 2 movie pps