‘सावळ्याची जणू सावली’ (Savlaychi Janu Savli) या मालिकेतील सावली तिच्या विनम्र स्वभावाने प्रेक्षकांची मने जिंकून घेत असल्याचे दिसते. काही दिवसांपूर्वीच तिचे व सारंगचे लग्न झाले आहे. जगन्नाथने तिलोत्तमाचा बदला घेण्यासाठी सारंग व सावलीचे लग्न लावून दिले. जगन्नाथचा मुलगी व तिलोत्तमाचा मुलगा हे प्रेमात होते. जेव्हा जगन्नाथ तिलोत्तमाकडे त्याच्या मुलीचे स्थळ घेऊन आला होता, त्यावेळी तिच्या दिसण्यावरून तिला हिणवत तिलोत्तमाने तिला नाकारले होते आणि तो अपमान सहन न झाल्यामुळे जगन्नाथच्या मुलीने आत्महत्या केली होती. ते लक्षात ठेवूनच जगन्नाथने सावळ्या दिसणाऱ्या सावलीबरोबर सारंगचे लग्न लावून दिले आणि सौंदर्याला अतिमहत्व देणाऱ्या तिलोत्तमाचा बदला घेतला. आता सावली जगन्नाथमुळे मेहेंदळे कुटुंबाची सून झाली आहे. झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो आता शेअर केला आहे.

मेहेंदळे कुटुंबावरील संकट दूर करण्यासाठी सावली काय करणार?

‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेचा प्रोमो झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, सावली तिच्या मोठ्या जावेला विचारते, “सकाळी सगळेच काळजीत होते. तुम्हाला माहितेय का काय झालंय ते?” त्यावर ती म्हणते, “कंपनीच्या अस्तित्वावरच प्रश्न निर्माण झाला आहे”. त्यानंतर सावली म्हणते, “महालक्ष्मीचं व्रत केलं ना की घरावर आलेलं संकट टळतं.” या प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, सावली तिच्या जावेबरोबर पूजा मांडत आहे. त्यानंतर ती कथा वाचत असल्याचे दिसते. यादरम्यानच सारंग व त्याचा लहान भाऊ गाडीतून कुठेतरी जात असल्याचे पाहायला मिळते. यावेळी अचानक त्यांच्या गाडीसमोर साध्या वेशातील एक वयस्कर स्त्री आल्याचे दिसत आहे. ती वयस्कर महिला सारंगकडे रोखून बघत असल्याचे दिसत आहे.

हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “सावलीचं व्रत दूर करेल का बिझनेसवरील संकट…?”, अशी कॅप्शन दिली आहे.

मालिकेत दाखविल्याप्रमाणे, सावली मेहेंदळे कुटुंबात लग्न करून आली असली तरीही सारंग तिला त्याची पत्नी मानत नाही. तिलोत्तमाला ती सून म्हणून व सारंगची बायको म्हणून ती नको आहे. कारण- गोऱ्या व सुंदर दिसणाऱ्याच लोकांना ती मान-सन्मान देते. ऐश्वर्याला तिच्या वैयक्तिक कारणांमुळे सावली नको आहे. तिचा स्वार्थ साधण्यासाठी ती सतत सावलीचा अपमान करताना दिसते. मात्र, सावलीची मोठी जाऊ, तिचे सासरे तिच्याशी नीट वागताना दिसतात. आता सावली तिचे सून होण्याचे कर्तव्य निभावताना दिसत आहे.

हेही वाचा: अभिनेते मिलिंद गवळी या वयात फिट राहण्यासाठी काय करतात? म्हणाले…

आता सावली व सारंग यांच्यामध्ये सर्व काही केव्हा ठीक होणार, सारंगचे सावलीविषयी असणारे गैरसमज कधी दूर होणार, सावलीला तिच्या सासरी मान-सन्मान मिळणार का, मालिकेत पुढे काय घडणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

Story img Loader