दोन महिन्यांपूर्वीच ‘झी मराठी’ वाहिनीवर ‘सावळ्याची जणू सावली’ ही नवी मालिका सुरू झाली. अवघ्या काही दिवसांत या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केलं आहे. त्यामुळे मालिकेतील कलाकारांनी साकारलेल्या व्यक्तिरेखा घराघरात पोहोचल्या आहेत. ‘सावळ्याची जणू सावली’मधील ऐश्वर्या मेहेंदळे म्हणजे वीणा जगतापने भैरवी वझे म्हणजे मेघा धाडेला दिवाळीनिमित्ताने खास गिफ्ट दिलं आहे; ज्याचा व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेत्री मेघा धाडे तिच्या इन्स्टाग्राम पेजवर वीणा जगतापच्या खास गिफ्टचा व्हिडीओ शेअर केला आहे. “आज माझं सोनं आणि चांदी झालं आहे. माझ्या प्रिय व्यक्तीने मला गिफ्ट दिलं आहे. थँक्यू,” असं कॅप्शन लिहित मेघा धाडेने व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मेघा म्हणाली की, हाय. ही पाडव्याची संध्याकाळ आहे. या दिवशी मला जी काही लॉटरी लागलेली आहे. त्याबद्दल मी काय सांगू! सगळ्यात आधी आदित्यने पाडव्याचं मला मंगळसूत्र गिफ्ट दिलं. त्यानंतर एक अंगठी दिली. त्यामुळे मला वाटलं आता पाडवा संपला आणि गिफ्ट संपले. पण, मला अजून एक खूप सुंदर गिफ्ट मिळालं आहे. ते गिफ्ट आहे हे सुंदर पैजण. हे पैजण आणणारी मुलगी पण तितकीच सुंदर आहे.

हेही वाचा – Video: ‘आई कुठे काय करते’ फेम रुपाली भोसलेने दिवाळीच्या मुहूर्तावर घेतली नवी आलिशान गाडी, पाहा व्हिडीओ

त्यानंतर वीणा जगताप म्हणाली, “हाय. तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या आणि पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. मी मनापासून मेघासाठी हे पैजण आणले आहेत. मला तिच्यासाठी साधं आणि खूप सुंदर गोष्ट द्यायची होती. पण, तिला आवडले की नाही तिलाच विचारा.” मग मेघा म्हणाली की, मला खूप आवडले. मी उद्या सेटवर घालून येईन. पण त्याआधी गंगाजल, हळद-कुंकू लावेन.

हेही वाचा – सातत्याने येणाऱ्या धमक्यांदरम्यान सलमान खान पोहोचला हैदराबादमध्ये; भाईजान ताज फलकनुमा पॅलेसमध्ये करणार ‘सिकंदर’ चित्रपटाचं चित्रीकरण

हेही वाचा – Bigg Boss 18: आता ‘बिग बॉस १८’चं होस्टिंग करणार रवि किशन, सलमान खानची घेतली जागा? नेमकं काय घडलंय? वाचा…

दरम्यान, ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत वीणा जगताप आणि मेघा धाडे व्यतिरिक्त प्राप्ती रेडकर, साईंकीत कामत, सुलेखा तळवलकर, भाग्यश्री दळवी, रमेश रोकडे, पूनम चौधरी, सर्वेश जाधव, गौरी किरण असे तगडे कलाकार मंडळी आहेत. ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेची कथा ‘कृष्णकोळी’ बंगाली मालिकेवर आधारित आहे. या मालिकेचे रिमेक तेलुगू, भोजपूरी, तमिळ, मल्याळम या भाषांमध्ये झाले आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Savlyachi janu savali fame veena jagtap gift to megha dhade pps