मकर संक्रातीचा सण जवळ आला आहे. सण म्हटलं की सगळीकडे आनंद व उत्साहाचे वातावरण असते. सण-उत्सवामुळे नात्यांमधील गोडवा वाढतो, दूर गेलेली नाती जवळ येतात. सगळीकडे उत्साहाचे वातावरण पाहायला मिळते. आता मालिकांमध्येसुद्धा सण-उत्सवांदरम्यान वेगळे ट्रॅक पाहायला मिळतात. आता झी मराठी वाहिनीवरील ‘सावळ्याची जणू सावली'(Savlyachi Janu Savli) व ‘पारू'(Paaru) मालिकेत नवीन वळण येणार असल्याचे समोर प्रोमोमध्ये पाहायला मिळते.
सारंग-सावलीचे नाते फुलणार
झी मराठी वाहिनीने समोर आलेल्या प्रोमोमध्ये पारू व सावळ्याचा जणू सावली मालिकेचा एकत्रित प्रोमो शेअर केला आहे. समोर आलेल्या प्रोमोमच्या सुरूवातीला पाहायला मिळते की सारंग सावलीच्या घरात आहे. सावली त्याला धोतर नेसण्यासाठी मदत करते. यावेळी सारंगला धोतर नेसता येत नाही, म्हणून सावलीचा लहान भाऊ अप्पू त्याच्यावर हसतो व त्याच्या बहिणीला म्हणजेच सावलीला सर्वकाही येते, असे म्हणत तिचे कौतुक करताना दिसतात. सावली व सारंग यांच्यामध्ये छोट्या-मोठ्या गंमतीजमती घडताना दिसत आहेत. तसेच सावलीचा पदर आगीने पेट घेत असताना सारंग तिला वाचवतो, असेही पाहायला मिळते. या संक्रातीला सारंग व सावलीच्या नात्यातील गोडवा तीळ-तीळ वाढणार, असे या प्रोमोमध्ये म्हटले आहे.
याच प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, पारू व आदित्य एका ठिकाणी गेले आहेत. तिथे दोन व्यक्ती येतात व पारूला बघून म्हणतात की ही तीच आहे जिचं तोंड काळं केलेलं. पुन्हा एकदा तोंड काळं करायंच का? त्यांचे हे बोलणं ऐकाताच आदित्यचा संताप अनावर होतो. तो त्या माणसांना मारतो. शेवटी अहिल्यादेवी त्याला अडवते. पारूकडे ती रागाने बघत असल्याचे पाहायला मिळते. त्यानंतर पारू खाली मान घालून उभी असेलली दिसत आहे. आई-मुलाच्या नात्यावर आलेली ही संक्रांत पारू करू शकेल का दूर? असे या प्रोमोमध्ये ऐकायला मिळत आहे.
हेही वाचा: Video: सखी गोखले-सुव्रत जोशीचा पहाटे २ वाजता शाहरुख खानच्या ‘या’ गाण्यावर भन्नाट डान्स, पाहा व्हिडीओ
दरम्यान, आता या दोन्ही मालिकेत नेमके काय घडणार हे पाहणे, महत्वाचे ठरणार आहे.