‘सावळ्याची जणू सावली’ (Savlyachi Janu Savli) ही मालिका विविध गोष्टींमुळे अगदी सुरुवातीपासून चर्चेत असल्याचे पाहायला मिळाले. गरीब कुटुंबातील, सावळ्या रंगाची, गोड आवाजात गाणे गाणारी अशी ही सावली आहे; तर दुसरीकडे श्रीमंत कुटुंबातील हँडसम दिसणारा असा सारंग आहे. सारंगच्या आईला तिलोत्तमाला सुंदर, गोऱ्या वर्णाचेच लोक आवडतात, त्यामुळे तिला तिच्या मुलाची पत्नी सुंदर मुलगी असावी अशी तिची इच्छा होती. मात्र, जगन्नाथने तिलोत्तमाचा बदला घेण्यासाठी सावली व सारंगचे लग्न लावून दिले. आता सावली व सारंगचे लग्न झाले आहे. ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेत सावली ही भूमिका अभिनेत्री प्राप्ती रेडकर (Prapti Redkar)ने साकारली आहे, तर सारंग ही भूमिका साईंकित कामत (Sainkeet Kamat)ने निभावली आहे. आता एका मुलाखतीत सेटवर त्यांची पहिली भेट कशी झाली, याबद्दल वक्तव्य केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाली अभिनेत्री?

अभिनेत्री प्राप्ती रेडकर व अभिनेता साईंकित कामत यांनी नुकतीच ‘कलाकट्टा’ या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना विचारले की, सहकलाकार म्हणून जेव्हा तुम्ही एकमेकांना सेटवर पहिल्यांदा भेटला तेव्हा एक वेगळा विचार आला होता. आता इतके दिवस काम केल्यानंतर तर तो विचार बदलला आहे. वेगळं मत झालंय, असं घडलं आहे का? यावर उत्तर देताना प्राप्ती रेडकरने म्हटले, “मी साईंकितला पहिल्यांदा लूक टेस्टला भेटले होते, तेव्हा त्याचा खडूसवाला सीन होता, तो मला चोर समजतो वैगेरे. त्याशिवाय आमच्यात काही बोलणं झालं नव्हतं. तर मला असं वाटलं की, हा खऱ्या आयुष्यातसुद्धा खूप खडूस आहे, त्यामुळे मी याच्यापासून लांब राहायचे. मला असं वाटलं की मी एखादं वाक्य विसरले तर हा खूप जोरात ओरडेल, म्हणून मी सुरुवातीचे दिवस याच्यापासून लांबच राहायचे. पण, हा खूप शांत वैगेरे आहे, त्याने एक नवीन आयडिया दिलीय. ती अशी आहे की कोणाला झोप आलीय, कंटाळा आलाय असं वाटत असेल तर एक गाणं लावायचं आणि त्यावर नाचायचं, त्यामुळे उत्साह येतो”, असे म्हणत प्राप्ती रेडकरने साईंकितला पहिल्यांदा भेटल्यावर काय वाटलं होतं, हे सांगितलं आहे.

साईंकित जेव्हा प्राप्तीला भेटला होता त्यावेळी त्याला प्राप्तीबद्दल काय वाटलं होतं? यावर बोलताना अभिनेत्याने म्हटले, “मी पहिल्यांदा कोणाला जज करीत नाही. ती छान आहेच. मला एक गोष्ट कळाली की ती खूप चांगली अभिनेत्री आहे. या वयात ती इतक्या प्रगल्भतेने काम करतेय. तिला माहिती नाहीये की ती काय काम करतेय, पण खरंच छान काम करतेय”, असे म्हणत साईंकितने प्राप्तीच्या कामाचे कौतुक केले आहे.

हेही वाचा: Video : “शिवा आज खऱ्या अर्थानं जिंकली…”, ‘शिवा’ फेम पूर्वा कौशिकने शेअर केला ‘तो’ व्हिडीओ; म्हणाली…

‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत सावली व सारंगचे त्यांच्या मनाविरुद्ध लग्न झाले आहे. सारंगने सावलीला पत्नीचा तसेच तिलोत्तमाने तिला सूनेचा मान दिला नाही. मात्र, सावली तिच्या घरच्यांचा विचार करून त्यांच्या घरी राहते. आता मालिकेत पुढे काय होणार, सावली व सारंगमध्ये मैत्री कधी होणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Savlyachi janu savli fame prapti redkar reveals she thought sainkeet kamat was very rude says but he is chill nsp