‘होणार सून मी ह्या घरची’, ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता शशांक केतकर नेहमीच चर्चेत असतो. आपल्या अभिनयाने शशांकने मनोरंजनसृष्टीत एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. अभिनेता अभिनयाबरोबरच त्याच्या परखड मतांमुळेही चर्चेत असतो. नुकतीच शशांकने ‘मित्र म्हणे’ या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. यावेळी त्यानं पहिल्या नाटकात काम करताना एका ज्येष्ठ अभिनेत्यानं त्याच्यावर टीका केली होती, तो किस्सा सांगितला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या मुलाखतीमध्ये टेलिव्हिजन कलाकारांना दुय्यम वागणूक का दिली जाते? याविषयी बोलत असताना शशांकने त्याला आलेला एक अनुभव सांगितला. तो म्हणाला की, “माझ्या पहिल्या नाटकात, अर्थात मी त्यांचं नाव घेणार नाही. पण, ते नाट्यसृष्टीतील खूप मोठे अभिनेते, दिग्दर्शक आहेत. ते एका मुलाखतीमध्ये म्हणता म्हणता म्हणाले होते की, हे अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले आजचे आता व्यावसायिक नाटक करायला लागले. एक मालिका केली, आता हा नाटकात काम करतोय. मला असं झालं की, तुम्ही असं बोलू नका.”

हेही वाचा – अक्षय कुमारचा बहुचर्चित ‘ओह माय गॉड २’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलणार? जाणून घ्या कारण

“तुम्ही पण कशाने तरी सुरुवात केली असेल ना, तर आम्ही टेलिव्हिजनने केली. पण याचा अर्थ असा होतं नाही की, आम्ही त्यासाठी लायक नाही आहोत किंवा आम्ही नाटक करणं वैध नाही, असं नाही होऊ शकत. तुम्ही जी आता उदाहरणं देतायत की, तेव्हा शौचालय नसायचे, नीट सोयी नसायच्या, प्रवास आम्ही कसाही करायचो. खस्ता खाऊन आम्ही नाटक जिवंत ठेवलं. त्याबद्दल मला खूप आदर आहे. तुम्ही ते जिवंत ठेवलं म्हणून आज आम्ही करू शकतोय. पण, आमच्याही पिढीनं आज तसंच केलं पाहिजे असं काही नाहीये. आमची पिढी आज मागणी करते आहे, तर त्याच्यामागे त्यांचीही काही कारणं असतील”, असं शशांक केतकर स्पष्टच म्हणाला.

हेही वाचा – Video: “नवरा दुसऱ्या मुलींबरोबर…” अभिनेत्री ऐश्वर्या नारकरांच्या ‘त्या’ रीलवर नेटकऱ्याची कमेंट, सडेतोड उत्तर देत म्हणाल्या…

हेही वाचा – Video: अभिनेत्री तेजश्री प्रधानने चाहत्यांसाठी दिली खुशखबर, लवकरच….

दरम्यान, सध्या शशांक ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘मुरांबा’ या मालिकेत दिसत आहे. शशांकची ही देखील मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. ‘मुरांबा’ या मालिकेत अभिनेत्याने अक्षय मुकादमची भूमिका साकारली आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Senior actor criticized on shashank ketkar in the first drama pps