‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘ठरलं तर मग’ सध्या चांगलीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. टीआरपीच्या शर्यतीमध्ये ही मालिका ‘स्टार प्रवाह’वरच्या गाजलेल्या अनेक मालिकांना मागे टाकतं अव्वल स्थानावर आहे. प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी ही मालिका अभिनेत्री मिरा जगन्नाथनं सोडल्याचं काल (६ जुलै) समोर आलं होतं. त्यानंतर आता ‘ठरलं तर मग’ मालिकेतील ज्येष्ठ अभिनेत्यानं प्रेक्षकांचा घेतला आहे.

हेही वाचा – “मला ‘हे’ दुःख गेले चार-पाच दिवस सतावतंय…” क्रांती रेडकरचा नवा व्हिडीओ चर्चेत

Madalsa Sharma quits Anupamaa
मिथुन चक्रवर्तींच्या सूनेने सोडली लोकप्रिय मालिका; म्हणाली, “माझे पती अन् सासरे…”
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
Navra Maza Navsacha 2 loksatta latest news
पुन्हा एकदा मनोरंजनाचा प्रवास, ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटातील कलावंत ‘लोकसत्ता’ कार्यालयात
Mahima Chaudhry met Hina Khan during her cancer treatment
कर्करोगावर मात करणाऱ्या महिमा चौधरीने हिना खानची घेतली भेट, अभिनेत्री फोटो शेअर करत म्हणाली….
Director Called Me Daughter and Raped said Actress
Kerala Actress : “दिग्दर्शक मला म्हणायचा तू मुलीसारखी आहेस, त्याने वर्षभर बलात्कार केला आणि..”, अभिनेत्रीची आपबिती
Mammootty breaks silence
Mammootty : “चित्रपट म्हणजे समाजाचं प्रतिबिंब, त्यात..” ; हेमा समितीच्या अहवालावर अभिनेते मामुट्टींनी सोडलं मौन
amitabh bachchan reacting on re releasing movies
जुन्या चित्रपटांचे पुन:प्रदर्शन! अमिताभ बच्चन एव्हरग्रीन ‘शोले’बद्दल म्हणाले, “मोबाइलवर कधीही चित्रपट पाहिला नाही…”
actress kangana ranaut praises indira gandhi during promotion of upcoming hindi film emergency
इंदिरा गांधींच्या आयुष्यातून खूप काही शिकण्यासारखं! अभिनेत्री दिग्दर्शक कंगना राणावतचे मत

‘ठरलं तर मग’ मालिकेत अभिनेत्री मिरा जगन्नाथ साक्षी ही भूमिका निभावत होती. पण मिरानं अचानक ही मालिका सोडली आहे. यामागचं अद्याप कारण स्पष्ट झालेलं नसून तिच्या जागी अभिनेत्री केतकी पालव आली आहे. आता मालिकेत साक्षीची भूमिका केतकी पालव निभावत आहे.

हेही वाचा – ‘हा’ अभिनेता साकारणार होता आनंद दिघेंची भूमिका, पण…; दिग्दर्शक प्रवीण तरडेंचा खुलासा

हे वृत्त ताजे असतानाच आता ‘ठरलं तर मग’ मालिकेतील साक्षीचे वडील महिपत ही भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते माधव अभ्यंकरांनी सुद्धा प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. यामागचं कारण देखील अद्याप अस्पष्ट आहे. आता माधव अभ्यंकर यांच्या जागी ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेते मयूर खांडगे ‘महिपत’च्या भूमिकेत दिसणार आहेत.

हेही वाचा – “‘मुळशी पॅटर्न’ पाहिल्यावर कॉलर तोंडात पकडून कौतुक करणाऱ्या सलमानने…”, उपेंद्र लिमये यांचं विधान

मयूर खांडगे यांनी ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत संजनाचा पूर्वाश्रमीचा पती ‘शेखर’ ही भूमिका साकारली होती. तसेच ते ‘शाब्बास सूनबाई’, ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ या मालिकेत झळकले होते.