‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही टीव्हीवरील लोकप्रिय विनोदी मालिका आहे. या मालिकेत तारक मेहतांची भूमिका साकारणाऱ्या शैलेश लोढा यांनी मालिका सोडल्यानंतर बरीच चर्चा झाली. त्यांनी निर्मात्यांशी झालेल्या वादातून मालिका सोडल्याचं म्हटलं गेलं. शैलेश लोढा हे देखील अप्रत्यक्षपणे निर्माते असित मोदी यांच्यावर निशाणा साधताना दिसून आले. पण त्यांनी खुलेपणानं यावर भाष्य केलं नाही. त्यांनी मालिका सोडल्यानंतर भूमिका साकारण्यासाठी नवीन कलाकाराची एंट्री झाली. अशातच शैलेश लोढा मालिकेत परतणार का, अशी चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.
हेही वाचा – “दक्षिणेकडील चार चित्रपट…” बॉलिवूड विरुद्ध दाक्षिणात्य वादावर कार्तिक आर्यनची स्पष्ट भूमिका
‘तारक मेहता’चे दिग्दर्शक मालव राजदा सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय आहे. त्यांनी आज काही मित्रांसह एक फोटो शेअर केला आहे, त्यात पूर्वीचे तारक मेहता म्हणजेच शैलेश लोढा देखील आहेत. हा फोटो शेअर करत “मेहता साब को छोड के बाकी सब का पॅक अप” म्हणत शोमध्ये ज्या व्यक्तीला मी सर्वात जास्त त्रास दिला आहे,” असं कॅप्शन मालव यांनी दिलं आहे.
दरम्यान, मालव आणि शैलेश लोढा यांचा हा एकत्र फोटो पाहून हे दोघे पुन्हा एकत्र काम करणार का, तसेच शैलेश लोढा मालिकेत परतणार का, अशा चर्चा होत आहेत. अनेक चाहत्यांनी यावर कमेंट्स करून शैलेश लोढा यांनी मालिकेत परतावं, असं म्हटलंय. “शैलेश सर प्लीज तुम्ही शोमध्ये परत या” अशा कमेंट्स केल्या आहेत.
‘आरजे सिद्धार्थ कन्नन’ला दिलेल्या मुलाखतीत शैलेश लोढा यांना शो सोडण्याचे कारण विचारण्यात आलं होतं. तेव्हा ते “थोडा वेळ जाऊ द्या लोकांना सत्य कळेल,” असं म्हणाले होते.
आतापर्यंत दिशा वकानी, नेहा मेहता, गुरचरण सिंग, राज अनाडकट, भव्य गांधी यांच्यासह बऱ्याच कलाकारांनी ही मालिका सोडली आहे. त्यांच्याजागी नवीन कलाकारही आलेत. पण मालिकेत अजून दिशा वकानी म्हणजेच दयाबेन यांच्या भूमिकेसाठी कोणत्याही नवीन अभिनेत्रीला आणण्यात आलेलं नाही.