‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका मागच्या काही महिन्यांपासून सातत्याने चर्चेत आहे. शोमध्ये तारक मेहताची भूमिका करणाऱ्या शैलेश लोढा यांनी १४ वर्षे काम केल्यानंतर मालिका सोडली. त्यानंतर रोशन सोढीची भूमिका साकारणाऱ्या जेनिफर मिस्त्रीने मालिकेच्या निर्मात्यांवर गंभीर आरोप केले होते. आता शैलेश लोढा यांच्याशी संबंधित एक बातमी समोर आली आहे. शैलेश यांनी निर्माते असित मोदी यांच्यावर थकबाकी न भरल्याबद्दल दाखल केलेला खटला जिंकला आहे. मे महिन्यात खटल्याचा निकाल आल्याची माहिती समोर आली आहे.

“आम्ही वसुलीसाठी कधीही…”, नितीन देसाई आत्महत्या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर एडलवाईस कंपनीचे स्पष्टीकरण

State Congress president Nana Patole demanded those who desecrate constitution should punished
“संविधानाची विटंबना करण्याचे धाडस होतेच कसे,” नाना पटोले यांची टीका; म्हणाले…
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Sanjay Raut on Opration Lotus
Sanjay Raut : ‘मविआ’चे खासदार फुटणार असल्याची चर्चा; संजय राऊत म्हणाले, “भाजपा कोणतंही ऑपरेशन लोटस…”
Rahul Gandhi Protest against modi shah
मोदी-अदाणीविरोधात काँग्रेस आक्रमक; राहुल गांधींच्या अनोख्य आंदोलनाने वेधले लक्ष
Shivsena UBT News
Shiv Sena UBT : “ठाकरेंच्या शिवसेनेला नाकारण्याचा जनतेचा निर्णय किती योग्य, हेच पुन्हा अधोरेखित होतंय”, भाजपा नेत्याची आगपाखड
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!
Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान
What Devendra Fadnavis Said About Rahul Narwekar ?
Devendra Fadnavis : “राहुल नार्वेकर पुन्हा येईन म्हणाले नव्हते तरीही पुन्हा आले..”, देवेंद्र फडणवीस यांचं खुमासदार भाषण

‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, शैलेश यांनी एप्रिल २०२२ मध्ये मालिका सोडली आणि या वर्षाच्या सुरुवातीला त्यांनी वर्षभराच्या थकबाकीच्या मंजुरीसाठी राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण म्हणजेच NCLT शी संपर्क साधून तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाची व्हर्चुअल सुनावणी झाली आणि दोन्ही पक्षकारांच्या वकिलाद्वारे सेटलमेंट करण्यात आले. असित मोदी यांनी शैलेश यांना सेटलमेंट अटींनुसार १ कोटी ५ लाख ८४ हजार रुपये डिमांड ड्राफ्टद्वारे द्यावे लागणार आहेत.

Akelli Trailer : युद्धग्रस्त इराकमध्ये अडकलेल्या भारतीय मुलीची कहाणी, ‘अकेली’चा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर

शैलेश यांनी ‘ई-टाइम्स’ला सांगितलं की ते या निर्णयावर खूश आहेत. त्यांनी एनसीएलटीचे आभार मानले. “ही लढाई पैशासाठी कधीच नव्हती. ती न्याय आणि स्वाभिमानासाठी होतील. मी ही लढाई जिंकली आहे आणि सत्याचा विजय झाला आहे, त्याचा मला आनंद आहे,” असं शैलेश म्हणाले. “माझी थकबाकी क्लिअर करण्यासाठी मी काही कागदपत्रांवर सही करावी अशी त्याची इच्छा होती. मी माध्यमांशी आणि इतर गोष्टींशी बोलू शकत नाही, अशी काही कलमं त्यात होती. पण मी त्यावर सही केली नाही. माझे स्वतःचे पैसे मिळवण्यासाठी मी कोणत्याही कागदपत्रांवर सही का करू?” असं त्यांनी नमूद केलं.

नितीन देसाईंचे पार्थिव पाहून कुटुंबीयांना अश्रू अनावर, पत्नी व मुलीचे फोटो आले समोर

शैलेश यांनी त्यांच्या थकबाकीसाठी लढा दिल्याने शोमधील दुसऱ्या एका अभिनेत्याला मदत झाल्याचं सांगितलं. “मी नाव सांगणार नाही, पण मालिकेतील एका अभिनेत्याला तीन वर्षांहून अधिक काळ पगार मिळाला नव्हता. मी खटला दाखल केल्यानंतर, त्याला प्रॉडक्शन हाऊसने बोलावले आणि त्याची थकबाकी देण्यात आली, नंतर त्या अभिनेत्याने फोन करून माझे आभार मानले,” असं शैलेश म्हणाले.

Story img Loader