‘शाका लाका बूम बूम’ मालिकेत संजूची भूमिका करून लोकप्रिय झालेला अभिनेता किंशूक वैद्यने पोलिसात तक्रार दिली आहे. त्याने अलिबागमधील काही स्थानिकांविरोधात तक्रार केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून अलिबागमधील काही स्थानिक लोकांकडून त्रास दिला जात असल्याचं त्याने म्हटलंय. त्याने नागावच्या सरपंचावर आरोप केले असून त्यांनी गेटची तोडफोड केल्याचंही तक्रारीत म्हटलंय.
“माझ्यासोबत सिगारेट प्यायला येशील का?” चाहत्याच्या प्रश्नावर शाहरुख खान म्हणाला, “मी माझ्या…”
किंशुक वैद्य म्हणाला, “नागावमध्ये माझी वडिलोपार्जित मालमत्ता आहे, २०२२ मध्ये आम्ही त्याचं रिसॉर्ट बनवलं. आता काही महिन्यांपासून काही स्थानिक रहिवासी त्रास देत आहेत. २५ जून रोजी सकाळी साडेआठ वाजता नागावचे सरपंच निखिल मयेकर यांनी त्यांच्या एका मित्राला माझ्या स्टाफचे गेट तोडण्यासं सांगितलं. ज्याला हे करण्यास सांगितलं तो लँड मूव्हरचा मालक आणि ऑपरेटर आहे.”
कोकणातील गावी पोहोचला भाऊ कदम, कौलारू घरातील लाकडी फळीवर लिहिलेली ‘ती’ दोन वाक्ये चर्चेत
या घटनेचे सीसीटीव्ही रेकॉर्डिंग असल्याचं किंशुक वैद्यने म्हटलं आहे. त्याने अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून पुरावेही पोलिसांना सोपवले आहेत. त्या लोकांना एक रुंद रस्ता हवा आहे, त्यासाठी अभिनेत्याला त्याच्या मालमत्तेतली थोडी जागा द्यावी लागेल, त्यासाठी हा सगळा प्रकार सुरू असल्याचं किंशुकने सांगितलं. किंशुक म्हणाला, “मला देशाच्या कायदा आणि न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. मला फक्त हा छळ थांबवायचा आहे.”
दुसरीकडे ‘ईटाईम्स’ने सरपंच निखिल मयेकर यांच्याशी बातचीत केली. त्यांनी किंशुकचे आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच किंशुकने स्थानिकांना त्रास देण्यासाठी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याचं म्हटलं आहे.