Kinshuk Vaidya Wedding: ‘स्टार प्लस’वरील ‘शाका लाका बूम बूम’ या मालिकेने त्याकाळी लहान मुलांना अक्षरशः वेड लावलं होतं. या मालिकेतील संजू आणि त्याची जादू पेन्सिलने लहानांना आकर्षित केलं होतं. ‘शाका लाका बूम बूम’ मालिकेतील संजू म्हणजेच अभिनेता किंशुक वैद्य आता मोठा झाला असून लग्नबंधनात अडकला आहे. किंशुकच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

३३ वर्षीय किंशुक वैद्यचा ( Kinshuk Vaidya ) ऑगस्ट महिन्यात साखरपुडा पार पडला होता. त्यानंतर तीन महिन्यांनी किंशुक बोहल्यावर चढला. दिक्षा नागपाल हिच्याशी किंशुकने मराठी रितीरिवाजानुसार लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या वाटेवर पाऊल ठेवलं आहे. किंशुक आणि दिक्षाचं लग्न मोठ्या थाटामाटात पार पडलं. या लग्नसोहळ्याला हिंदी मालिकाविश्वातील अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली होती. ‘कृष्ण’ म्हणून घराघरात पोहोचलेला अभिनेता सुमेध मुद्गलकर, हिमांशु सोनी, हिबा नवाब, शाहीर शेखसह अनेक कलाकार किंशुक आणि दिक्षाच्या लग्नात पाहायला मिळाले.

हेही वाचा – “अथक मेहनत करून…”, सहा महिन्यांत बंद होणाऱ्या ‘अबीर गुलाल’ मालिकेतील अभिनेत्रीचं पत्र; म्हणाली, “हाय अंबाबाईची साथ, तर…”

हळद, संगीत, सप्तपदी असं समारंभपूर्वक लग्न किंशुक आणि दिक्षाचं झालं. याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. लग्नासाठी किंशुक आणि दिक्षाने खास मराठमोळा लूक केला होता. किंशुकच्या ( Kinshuk Vaidya ) बायकोने केशरी रंगाची नऊवारी नेसली होती. तर अभिनेत्याने ऑफ व्हाइट रंगाचा आउटफिट परिधान केला होता. ज्यावर त्याने लाल रंगाचा फेटा बांधला होता. दोघं खूप सुंदर दिसत होते. अभिनेता सुमेधने दोघांच्या लग्नातील खास क्षण सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

किंशुक वैद्य बायको कोण आहे?

किंशुकची बायको दिक्षा नागपाल लोकप्रिय नृत्यदिग्दर्शिका आहे. ‘पंचायत २’ वेब सीरिजमधील एका आयटम साँगचं नृत्यदिग्दर्शन दिक्षाने केलं होतं. काही महिन्यांपूर्वी किंशुकचं ‘चन्ना वे’ नावाचं गाणं प्रदर्शित झालं होतं. या गाण्याचं दिग्दर्शन दिक्षाने केलं होतं. तसंच गाण्याची निर्मिती देखील तिच्याच कंपनीची होती. याशिवाय सध्या बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करणाऱ्या कार्तिक आर्यनच्या ‘भूल भुलैया ३’ चित्रपटात माधुरी दीक्षित आणि विद्या बालन यांना दिक्षाने कोरियोग्राफ केलं होतं.

हेही वाचा – Video: श्रद्धा कपूरच्या गाण्यावर ‘पारू’ फेम शरयू सोनावणेनेच्या लावणीचा ठसका; नेटकऱ्यांनी केलं कौतुक, म्हणाले, “कडक…”

दरम्यान, किंशुक वैद्य दिक्षा नागपालच्या आधी हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्रीला डेट करत होता. शिव्या पठानिया, असं तिच नाव आहे. पण २०२१मध्ये किंशुक ( Kinshuk Vaidya ) आणि शिव्याचा ब्रेकअप झाला.

किंशुक वैद्यच्या ( Kinshuk Vaidya ) कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘शाका लाका बूम बूम’ व्यतिरिक्त त्याने बऱ्याच हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे. त्याने ‘वो तो है अल्बेला’मध्ये उत्कृष्ट काम केलं होतं. त्यामुळे प्रेक्षकांना देखील त्याची भूमिका चांगलीच पसंतीस पडली होती. तसंच ‘वो अपना सा’, ‘एक रिश्ता साझेदारी का’, ‘जात ना पूछो प्रेम की’ आणि ‘कर्ण संगिनी’ या मालिकांमध्ये किंशुक विविध भूमिकेत पाहायला मिळाला.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shaka laka boom boom fame kinshuk vaidya get married photos viral pps