Kinshuk Vaidya Engagement : नॅशनल चॅनलनंतर ‘स्टार प्लस’वर प्रसारित होणारी ‘शाका लाका बूम बूम’ मालिका ही लोकप्रिय मालिकांपैकी एक ठरली. लहान मुलांना या मालिकेचं अक्षरशः वेड लागलं होतं. या मालिकेतील संजू आणि त्याच्या जादूई पेन्सिलने लहान मुलांना अधिक आकर्षित केलं होतं. त्यामुळे या मालिकेला लहान मुलांचा अधिक चांगला प्रतिसाद मिळाला. आता ‘शाका लाका बूम बूम’ मधील संजू मोठा झाला आहे. ३३ वर्षांच्या संजूला पाहून तुम्ही ओळखू देखील शकणार नाही. नुकताच संजू म्हणजे अभिनेता किंशुक वैद्यचा साखरपुडा पार पडला; ज्याचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.

अभिनेता किंशुक वैद्यने ( Kinshuk Vaidya ) साखपुड्याचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. या फोटोमध्ये किंशुक आपल्या होणाऱ्या बायकोबरोबर अंगठी दाखवताना दिसत आहेत. साखपुड्यासाठी किंशुक आणि त्यांच्या होणाऱ्या बायकोने खास लूक केला होता. किंशुकने निळ्या रंगाचा कुर्ता-पायजमा परिधान केला होता. तर किंशुकला मॅच करत त्याच्या होणाऱ्या बायकोने निळ्या रंगाची साडी नेसली होती.

marathi actress entered in the new serial of star pravah
आधी ‘ठरलं तर मग’ मालिकेत झळकली; आता ‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेत एन्ट्री! ‘ती’ अभिनेत्री कोण? प्रोमो आला समोर…
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Monika Dabade
डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात अभिनेत्री झाली भावुक; ‘ठरलं तर मग’च्या टीमबद्दल म्हणाली, “आतापर्यंत हे माझ्यादेखत…”
shradhha kapoor boyfriend
श्रद्धा कपूरच्या मोबाईल वॉलपेपरवरील ‘ती’ व्यक्ती कोण? व्हायरल फोटोंमुळे चर्चांना उधाण
tharla tar mag monika dabade baby shower ceremony
‘ठरलं तर मग’च्या सेटवर मोनिकाचं डोहाळेजेवण; मालिकेतील सर्व अभिनेत्री ऑफस्क्रीन आल्या एकत्र, पती उखाणा घेत म्हणाला…
Ankita Walawalkar First Kelvan
Video : “वालावलकरांची पोरगी पटवली…”, अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याने घेतला हटके उखाणा, ‘असं’ पार पडलं पहिलं केळवण
zee marathi navri mile hitelarla fame leela special ukhana
Video : “एजे तिळासारखे कडू अन् मी…”, लीलाने घेतला झकास उखाणा! तर, तुळजा काय म्हणाली? एकदा ऐकाच…
ankita walawalkar aka kokan hearted girl first kelvan
‘कोकण हार्टेड गर्ल’ची लगीनघाई! अंकिता-कुणालचं पार पडलं पहिलं केळवण, फोटो आला समोर, लग्नपत्रिका पाहिलीत का?

हेही वाचा – प्लास्टिक सर्जरीनंतरचा ‘त्या’ फोटोमुळे आयशा टाकिया झाली ट्रोल, अखेर नाराज होऊन इन्स्टाग्राम अकाउंट केलं डिलीट

किंशुकच्या ( Kinshuk Vaidya ) साखरपुड्याचा फोटो पाहून इतर कलाकार मंडळींसह त्याचे चाहते शुभेच्छा देत आहेत. अभिनेत्री दिशा परमार, शहीर शेख, हीबा नवाब, प्रियंवदा कांत अशा अनेक कलाकारांनी किंशुकला शुभेच्छा दिल्या आहेत.

किंशुक वैद्य होणारी बायको कोण आहे?

किंशुकच्या ( Kinshuk Vaidya ) होणाऱ्या बायकोचं नाव दिक्षा नागपाल असं आहे. दिक्षा ही लोकप्रिय नृत्यदिग्दर्शिका आहे. ‘पंचायत २’ वेब सीरिजमधील एका आयटम साँगचं नृत्यदिग्दर्शन दिक्षाने केलं होतं. काही महिन्यांपूर्वी किंशुकचं ‘चन्ना वे’ नावाचं गाणं प्रदर्शित झालं होतं. या गाण्याचं दिग्दर्शन दिक्षाने केलं होतं. तसंच गाण्याची निर्मिती देखील तिच्याच कंपनीची होती.

हेही वाचा – लग्नाच्या तीन वर्षांनंतर अंकिता लोखंडे होणार आई? मित्र अली गोनीने केला खुलासा!

दरम्यान, दिक्षा नागपालच्या आधी किंशुक वैद्य हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्रीला डेट करत होता. शिव्या पठानिया, असं तिच नाव आहे. पण २०२१मध्ये किंशुक आणि शिव्याचा ब्रेकअप झाला.

किंशुक वैद्यच्या ( Kinshuk Vaidya ) कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘शाका लाका बूम बूम’ व्यतिरिक्त त्याने बऱ्याच हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे. त्याने ‘वो तो है अल्बेला’मध्ये उत्कृष्ट काम केलं होतं. त्यामुळे प्रेक्षकांना देखील त्याची भूमिका चांगलीच पसंतीस पडली होती. तसंच ‘वो अपना सा’, ‘एक रिश्ता साझेदारी का’, ‘जात ना पूछो प्रेम की’ आणि ‘कर्ण संगिनी’ या मालिकांमध्ये किंशुक विविध भूमिकेत पाहायला मिळाला.

Story img Loader