बिग बॉस १६ सुरू होऊन एक आठवडा पूर्ण झाला आहे आणि अशातच शालीन भानोत सातत्याने सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्याच्या वक्तव्यांमुळे बिग बॉसच्या घरात सातत्याने काही ना काही वाद होताना दिसत आहे. या आठवड्याच्या सुरुवातीलाच त्याला कॅप्टनशिपच्या दावेदारीतून बाहेर करण्यात आलं आहे. पण तरीही तो त्याच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. आता त्याने सौंदर्या शर्माच्या अंतर्वस्त्रांवर कमेंट केल्याने तो चर्चेत आला आहे.

नुकत्याच प्रसारित झालेल्या एका एपिसोडमध्ये शालीन अप्रत्यक्षपणे सौंदर्या शर्माच्या अंतर्वस्त्रांवर कमेंट करताना दिसला आहे. त्याचं हे बोलणं सौंदर्याला अजिबात आवडलेलं नाही मात्र तिने यावर त्यावेळी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण नंतर तिने आपली नाराजी कॅप्टन गौतमला बोलून दाखवली. यावेळी शालीनचं बोलणं आपल्याला आवडलेलं नाही असं तिने सांगितलं आहे.

आणखी वाचा- Bigg Boss 16 : शालीन भानोतने दिली चेकअपसाठी आलेल्या डॉक्टरांना धमकी, व्हिडीओ समोर आल्यानंतर नेटकरी संतापले

नव्या एपिसोडमध्ये शालीनने कमेंट केल्यानंतर ही बाब गौतमला सांगताना सौंदर्या म्हणाली की, “शालीन बोलता बोलता मस्करी करत म्हणाला की त्याला एका विशिष्ट अंडरगार्मेंटचे कपडेच आवडतात. त्याने यावेळी Calvin Klein ब्रँडचं नाव घेतलं. नंतर माझ्या लक्षात आलं की मी त्याच ब्रँडचे कपडे परिधान केले आहेत. त्यावेळी टीनासुद्धा तिथे उपस्थित होती. मात्र त्याचं बोलणं एकून मला अनकम्फर्टेबल वाटलं.” यावर गौतमने तिला म्हटलं की, “जर तुला त्याचं बोलणं आवडलेलं नाही तर तू त्यावर लगेचच प्रतिक्रिया का दिली नाहीस. तू त्यावेळी ते बोलणं मस्करीत घ्यायला नको होतं. तू त्याला अशी मस्करी करण्यापासून थांबवायला हवं होतं.” यामुळे शालीनवर सोशल मीडियावरून खूप टीका होत आहे.

दरम्यान शालीन भानोतचं नाव बिग बॉसच्या घरातील सुंबुल तौकीर आणि टीना दत्ता यांच्याशी जोडलं गेलं आहे. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच शालीन सौंदर्याशी फ्लर्ट करताना दिसला होता. यावेळी त्याने तिला मदत करण्याच्या बदल्यात किस करण्यास सांगितलं होतं. ज्यामुळे गौतम भडकलेलाही पाहायला मिळाला होता. त्यानंतर आता शालीनने सौंदर्याच्या अंतर्वस्त्रांबद्दल अशाप्रकारे कमेंट केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. आता यावर मेकर्स किंवा होस्ट सलमान खान काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Story img Loader