‘बिग बॉस १६’मध्ये सध्या बराच ड्रामा, भांडणं आणि लव्ह अँगल पाहायला मिळत आहे. प्रत्येक सीझनमध्ये एक तरी लव्ह स्टोरी असतेच. अर्थात यातील काही जणांना खरं प्रेम मिळतं तर काही तर काहीजण घरातून बाहेर पडल्यानंतर वेगळे होताना दिसतात. या सीझनमध्येही असंच काहीसं चित्र दिसत आहे. बिग बॉस १६ चा सदस्य शालीन भानोत आणि टीना दत्ता यांच्यात काही दिवसांपासून जवळीक वाढताना दिसत आहे. आता या लव्ह अँगलवर शालीनची पूर्वाश्रमीची पत्नी दलजीत कौरनेही प्रतिक्रिया दिली आहे.
शालीन भानोतने काही दिवसांपूर्वीच टीना दत्ताकडे त्याच्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्यावेळी त्याने टीनासाठी त्याच्या मनात भावना असल्याचं मान्य केलं होतं. ‘इ-टाइम्स’शी बोलताना शालीनची पूर्वाश्रमीची पत्नी दलजीत कौरने या लव्ह अँगलवर प्रतिक्रिया दिली आणि इतर बऱ्याच बाबींचा खुलासा केला आहे. टीना आणि शालीनच्या नात्याबद्दल दलजीतला नेमकं काय वाटतं हेही सांगितलं.
आणखी वाचा- Bigg Boss 16: …अन् सर्वांसमोर शालीनने सौंदर्या शर्माला केलं Kiss; दोघांची जवळीक पाहून गौतम भडकला
दलजीत म्हणाली, “मला हे सर्व पाहून एवढंच वाटतं की, शालीन खरंच टीनावर प्रेम करत असेल तर चांगलंच आहे. पुन्हा एकदा प्रेमात पडणं हे आशीर्वादाप्रमाणे आहे. जर ते त्याला टीनाकडून मिळत असेल तर चांगलीच गोष्ट आहे. मला यावर काहीच आक्षेप नाही किंवा टीनाबद्दल कोणत्याही कठोर भावना नाहीत.”
आणखी वाचा- Bigg Boss 16 : “तू तिचा तमाशा…”, संबुल तौकीरच्या वडिलांनी शालीन भानोतला फटकारलं
दरम्यान बिग बॉस १६ मध्ये शालीन भानोत आणि टीना दत्ता यांच्या लव्ह अँगलची जोरदार चर्चा आहे. रोज या दोघांमध्ये जवळीक वाढताना दिसत आहे. पण घरातील अनेक सदस्यांना मात्र त्याचं हे नातं खोट आहे असं वाटतं. अनेकांनी यावर स्पष्ट मत व्यक्त केलं असून हे दोघं फक्त कॅमेरा आणि फुटेजसाठी हे सर्व करत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. अशात आता सुंबुलचं काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.