टीव्ही अभिनेत्री आणि बिग बॉस फेम दलजित कौर सध्या बरीच चर्चेत आहे. बिग बॉस १६ चा स्पर्धक शालीन भानोतची पूर्वाश्रमीची पत्नी दलजित आता दुसऱ्यांदा लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. मार्च २०२३ मध्ये दलजित युके बेस्ड बिझनेसमन निखिल पटेलशी लग्न करणार आहे. दोघांनी जानेवारी महिन्यात गुपचूप साखरपुडा उरकला होता. निखिलचंही हे दुसरं लग्न आहे. आता दलजितने तिच्या होणाऱ्या नवऱ्याबरोबरचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती इंटिमेट झालेली दिसत आहे.

दलजितने तिच्या इन्स्टाग्रामवर होणारा पती निखिलबरोबरचा एक व्हिडीओ शेअर करत एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे. तिने लिहिलं, “आफ्रिकेतील केनिया येथे शिफ्ट होण्याची पहिली झलक शेअर करत आहे. मला खात्री आहे की तुम्ही सर्वांनी या आठवड्यात माझ्या आणि निखिलच्या साखरपुड्याची बातमी वाचलीच असेल. आमच्या दोघांच्याही आयुष्यातील हा नवा अध्याय आहे. ज्याला आम्ही “टेक २” म्हणतो. अखेर… आमचं आयुष्य बदलणार आहे. २० वर्षे मुंबईत राहून आणि यशस्वी कारकीर्द घडवल्यानंतर केनिया, आफ्रिकेत स्थायिक होत आहे. मी कधीच भारताबाहेर गेले नाही. हे पाऊल माझ्यासाठी खूप उत्साही आहे. माझ्या मुलाच्या जेडनच्या शाळेपासून ते माझ्या करिअरपर्यंत… सर्व काही बदलणार आहे.”

Shocking video Man beat up girlfriend on road video goes viral on social media
“हे कसलं प्रेम? घरी आई-वडिलांचा एक शब्दही ऐकून न घेणाऱ्या मुली बॉयफ्रेंडचा मार कसा खातात?” धक्कादायक VIDEO व्हायरल
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Paaru
Video: “देवीआईंनासुद्धा कळायला पाहिजे…”, पारू अनुष्काचे सत्य अहिल्यादेवीसमोर आणणार? मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
How to make cool your wife after a fight
Video : भांडण झाल्यावर पत्नीला शांत कसं करावं, पुरुषांनी दिले भन्नाट उत्तरं; व्हिडीओ एकदा पाहाच
True love Viral Video
‘बायको, तू फक्त साथ दे..’ खऱ्या प्रेमाचं उदाहरण दाखविणारा सुंदर VIDEO एकदा पाहाच…
Shocking Video
Video : तुफान राडा! दोन तरुणी भिडल्या अन् एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “बॉयफ्रेंडसाठी..”
a newlywed bride said a beautiful ukhana for husband
Ukhana Video : “रुख्मिणीचा कृष्ण, सीतेचा राम…” नवरीने घेतला सुंदर उखाणा, VIDEO एकदा पाहाच
what is marriage a child told funny answer
Video : “लग्न म्हणजे काय?” चिमुकल्याने स्पष्टच सांगितले, “घोड्यावर बसून केलेला गाढवपणा” मजेशीर व्हिडीओ होतोय व्हायरल

आणखी वाचा- शालीन भानोतच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीने सांगितलं दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेण्यामागचं कारण, म्हणाली…

दलजीतने पुढे लिहिलं, “मी आणि निखिलने ठरवलं आहे की आम्ही आमचा प्रवास तुमच्याबरोबर शेअर करावा. एक अभिनेत्री या नव्या टप्प्यावर कशी पोहोचते ते पाहूया. माझं बॉलीवूड करिअर आणि माझ्या भावी पतीला हिंदी येत नसल्यामुळे मी सर्वकाही कसं सांभाळू?” या व्हिडीओमध्ये दलजीत कौरने सांगितलं की, “जेव्हा मी निखिलला पहिल्यांदा भेटले तेव्हा त्याच्या पायावर निळ्या रंगाची नेलपेंट होती. त्याला हिंदी येत नाही.” तर निखिल सांगतो की, “आम्ही पहिल्यांदाच दुबईत भेटलो.” या व्हिडिओमध्ये दोघेही किस करताना दिसत आहेत.

आणखी वाचा- “मी सावळी होते, पण…”, त्वचेच्या रंगावरून ट्रोल करणाऱ्यांना काजोलचं उत्तर

दरम्यान अर्जुन बिजलानीनेही दलजीत कौरच्या व्हिडिओवर कमेंट केली आहे आणि तिच्या नवीन आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. दलजीत कौरचं हे दुसरं लग्न आहे. तिने पहिल्यांदा बिग बॉस १६ चा स्पर्धक शालीन भानोतशी लग्न केलं होतं. पण १०१४ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. दोघांनाही एक मुलगा जेडन आहे. जो घटस्फोटानंतर आईसोबत म्हणजेच दिलजीतसोबत राहतो.

Story img Loader