बिग बॉस हिंदीचं सोळावं पर्व नुकतंच संपलं. पुण्याचा रॅपर एमसी स्टॅन हा या पर्वाचा विजेता ठरला. या कार्यक्रमातील टॉप 5 स्पर्धकांची चांगलीच चर्चा रंगली. यातील एक होता शालिन भानोत. या स्पर्धेत त्याला पाचव्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं. गेले काही दिवस त्याच्या या कार्यक्रमापेक्षाही त्याच्या वैयक्तिक आयुष्यात घडणाऱ्या घडामोडींमुळे तो चर्चेत आहे. आता अशातच बिग बॉस संपल्यानंतर पहिल्यांदाच तो चाहत्यांमध्ये मिसळल्यावर त्याला त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे ट्रोल केलं जात आहे.
बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यावर त्याला अनेक नवीन गोष्टी कळल्या. यातीलच एक गोष्ट म्हणजे त्याची पहिली पत्नी दलजीत कौर दुसऱ्यांदा विवाहबद्ध होणार आहे. आता यावरून नेटकरी त्याला टोमणे मारत आहेत. आता बिग बॉस १६ संपल्यानंतर पहिल्यांदाच शालिन त्याच्या चाहत्यांमध्ये मिसळला. या दरम्यानचा त्याचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यात तो गाडीच्या खिडकीतून बाहेर येऊन चाहत्यांमध्ये मिसळला आहे. त्याच्या गाडीला त्याच्या चाहत्यांनी घेरलं आहे. शालिनला पाहून तेथे उपस्थित त्याचे चाहते शालिनचं कौतुक करत आहेत. आता या व्हायरल व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
या व्हिडीओवर कमेंट करत एकाने लिहिलं, “काय उपयोग त्या चार कोटींच्या गाडीचा जर याला खिडकीतून बाहेर यायचं होतं!” तर दुसरा म्हणाला, ” याचा हा अभिनयही खोटा वाटत आहे.” आणखी एक नेटकरी म्हणाला, “आता याला कळलं बाहेरच्या जगात काय सुरू आहे.” तर एका नेटकऱ्याने लिहिलं, “याची पत्नी चालली आता केनियाला.” त्यामुळे शालिन आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
दरम्यान शालिन भनौतची पत्नी व अभिनेत्री दलजीत कौर दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकणार आहे. दलजित मार्च महिन्यात निखिल पटेलशी लग्नगाठ बांधणार आहे. नुकताच तिचा साखरपुडा पार पडला. तर त्याआधी शालिन आणि दलजीतने २००९ मध्ये लग्नगाठ बांधली होती. त्यानंतर लग्नाच्या सहा वर्षांनी घटस्फोट घेत ते एकमेकांपासून वेगळे झाले.