‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. गिरीजा प्रभु, मंदार जाधव, माधवी निमकर, वर्षा उसगावकर, मिनाक्षी राठोड, सुनिल गोडसे, कपिल होनराव, गणेश रेवडेकर अशी जबरदस्त कलाकार मंडळी असलेली ही मालिका टीआरपीच्या यादीतही अव्वल स्थानावर आहे. लवकरच मालिकेत मोठा ट्वीस्ट पाहायला मिळणार आहे. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिका २५ वर्षांचा लीप घेणार असून गौरी-जयदीपच्या पुनर्जन्माची कथा २० नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. पण मालिकेतील बऱ्याच पात्रांचा प्रवास आता संपणार आहे. मालिकेच्या नव्या कथानकात ही पात्र झळकणार नाहीयेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – “सदैव आठवणीत…”, ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेतील अभिनेत्रीची भावुक पोस्ट; सेटवरचे शेवटचे फोटो शेअर करत म्हणाली…

गेल्या सव्वा तीन वर्षांपासून ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. मालिकेतील प्रत्येक कलाकाराने निभावलेलं प्रत्येक पात्र घराघरात पोहोचलं आहे. गौरी, जयदीप, शालिनी, देवकी, माई, मल्हार, लक्ष्मी अशा सर्व पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात अटळ स्थान निर्माण केलं आहे. पण आता गौरी-जयदीपच्या पुनर्जन्माच्या कथानकात यातील बरीच पात्र दिसणार नाहीयेत. यामध्ये एका लाडक्या जोडीचा देखील समावेश आहे.

हेही वाचा – उर्मिला निंबाळकरच्या लेकाबरोबर नेमकी काय घडली होती विचित्र घटना? जाणून घ्या…

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेतील ही जोडी प्रेक्षकांची लाडकी जोडी आहे. कटकारस्थानी बायको आणि साधा-भोळा नवरा असलेली या जोडीने अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली होती. पण आता ही जोडी नव्या कथानकात दिसणार नाहीये. आतापर्यंत तुम्ही ही जोडी कोण आहे? हे ओळखलंच असेल. ही लाडकी जोडी म्हणजे शालिनी आणि मल्हाराची जोडी. होय, गौरी-जयदीपच्या पुनर्जन्माच्या कथेमध्ये शालिनी आणि मल्हार झळकणार नाहीयेत. काही दिवसांपूर्वीच दोघांचे म्हणजेच अभिनेत्री माधवी निमकर आणि अभिनेता कपिल होनराव यांचे शेवटचे शूटिंग पार पडले. त्यामुळे आता या नव्या कथेमध्ये खलनायिका कोण असणार? हा सर्वात मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.

हेही वाचा – “माझं छोटं बाळ आज २१ वर्षांचं झालं”, मलायका अरोराची लेकासाठी खास पोस्ट, म्हणाली, “प्रामाणिक…”

दरम्यान, सध्या ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिका रात्री ९.३० प्रसारित होत आहे. पण आता २० नोव्हेंबरपासून मालिका रात्री १० वाजता पाहायला मिळणार आहे. तसेच सध्याच्या वेळेत म्हणजेच रात्री ९.३० वाजता ईशा केसकर आणि अक्षर कोठारी यांची मालिका ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shalini and malhar couple will exit in sukh mhanje nakki kay asta marathi serial pps
Show comments