Shalva Kinjawadekar and Shreya Daflapurkar : मराठी कलाविश्वात सध्या लगीनघाई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. येत्या काही दिवसांत अनेक कलाकार लग्नबंधनात अडकून एका नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहेत. अभिषेक-सोनाली, हेमल इंगळे, शिवानी-अंबर, रेश्मा शिंदे या सगळ्याच कलाकारांच्या घरी सध्या लगीनघाई सुरू आहे. याशिवाय छोट्या पडद्यावर लोकप्रिय असलेल्या आणखी अभिनेत्याचं नुकतचं व्याहीभोजन पार पडलं आहे. ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ आणि ‘शिवा’ मालिकेतून अभिनेता शाल्व किंजवडेकर घराघरांत पोहोचला. छोट्या पडद्यावर त्याचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. आता लवकरच वैयक्तिक आयुष्यात शाल्व विवाहबंधनात अडकणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शाल्व किंजवडेकर वैयक्तिक आयुष्यात श्रेया डफळापुरकरशी लग्नगाठ बांधणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे दोघंही एकमेकांना डेट करत आहेत. या दोघांचा साखरपुडा २०२३ मध्ये पार पडला होता. यानंतर यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीला या दोघांच्या केळवणाची सुरुवात झाली होती. आता नुकतंच यांचं व्याहीभोजन पार पडलं आहे.

हेही वाचा : Pushpa 2 : यंदा समांथा नव्हे तर श्रीलीलाने गाजवलं ‘पुष्पा २’चं आयटम साँग! ‘Kissik’ गाण्याची पहिली झलक आली समोर

शाल्व आणि श्रेया यांचा व्याहीभोजन समारंभ नुकताच पार पडला. याचा फोटो या जोडप्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. श्रेयाने या फोटोला, “अलेक्सा प्ले एक दिन आप… व्याहीभोजन” असं कॅप्शन दिलं आहे. तिचं कॅप्शन वाचून शाल्वने कमेंट्समध्ये तिला ‘आय लव्ह यू’ म्हणत प्रेम व्यक्त केलं आहे. आता येत्या काही दिवसांत शाल्व आणि श्रेया लग्नबंधनात अडकणार असल्याचं बोललं जात आहे. परंतु, दोघांनी अद्याप लग्नाच्या तारखेची अधिकृतपणे घोषणा केलेली नाही.

श्रेया काय काम करते?

शाल्वची होणारी पत्नी श्रेया ही कॉस्ट्युम डिझायनर व स्टायलिश म्हणून ओळखली जाते. ‘Styling By Shreya’ असं तिच्या ब्रँडचं नाव आहे. अनेक सेलिब्रिटींसाठी तिने डिझायनर म्हणून काम सांभाळलं आहे. त्यामुळे इंडस्ट्रीमधल्या बऱ्याच कलाकारांची श्रेया खास मैत्रीण आहे.

दरम्यान, शाल्वच्या ( Shalva Kinjawadekar ) कामाबद्दल सांगायचं झालं, तर सध्या तो ‘झी मराठी’ वाहिनीवरच्या ‘शिवा’ मालिकेत आशुतोष ही प्रमुख भूमिका साकारत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shalva kinjawadekar shiva fame actor soon tie knot with shreya daflapurkar shared photos of vhyahibhojan sva 00