‘झी मराठी’ वाहिनीवर ‘पारु’ व ‘शिवा’ या दोन नव्या मालिका नुकत्याच सुरू झाल्या आहेत. पण यामधील ‘शिवा’ या मालिकेने सुरुवातीलाच प्रेक्षकांचा हिरमोड केला. १२ फेब्रुवारीपासून ‘शिवा’ मालिकेचं प्रेक्षपण सुरू होणार होतं. पण तांत्रिक कारणामुळे १२ फेब्रुवारी ऐवजी १३ फेब्रुवारीपासून ही मालिका सुरू झाली. अशातच या नव्या मालिकेतील एक सीन चांगलाच चर्चेत आला असून या सीनचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं आहे.

‘शिवा’ या नव्या मालिकेत अभिनेत्री पूर्वा फडकेने शिवानी उर्फ शिवा ही भूमिका साकारली आहे. तर अभिनेता शाल्व किंजवडेकरने आशुतोष उर्फ आशुची भूमिका साकारली आहे. या मालिकेतील आशु दिव्याला इस्प्रेस करण्यासाठी एक स्टंट करतो; याच सीनची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे.

Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
Daily zodiac sign horoscope For 17 December 2024
१७ डिसेंबर पंचांग: १२ पैकी ‘या’ राशींचे प्रगतीच्या…
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
Savlyachi Janu Savali
Video: सावली द्विधा मनस्थितीत अडकणार; भैरवीला दिलेले वचन कसे पूर्ण करणार? पाहा ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचा प्रोमो
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “जराही रोमँटिक नाहीस तू…”, तेजूच्या हळदीत तुळजा सूर्यावर रूसणार; ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेचा प्रोमो पाहिलात का?
a young guy said funny ukhana by mentioning the name of dhoni
“धोनीने मारला सिक्स…” तरुणाने घेतला भन्नाट उखाणा, VIDEO एकदा पाहाच
Navari Mile Hitlarla
Video : “तुम्हाला लाज नाही वाटली?”, लीलाने फ्रॉड उघड करताच एजेने दोन्ही मुलांना खडसावलं; पाहा ‘नवरी मिळे हिटलरला’चा नवा प्रोमो
Milind Gawali
मिलिंद गवळी यांचे सहकलाकाराबद्दलचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले, “भीती वाटायची की, आता मार…”

हेही वाचा – Video: नव्या मालिकांच्या शर्यतीत आता ‘कलर्स मराठी’ची एन्ट्री, केदार शिंदे यांनी केली ‘इंद्रायणी’ मालिकेची घोषणा

‘झी मराठी’च्या सोशल मीडियावर हा सीन शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये आशुने दिव्याला इम्प्रेस करण्यासाठी हातात विषारी साप पकडल्याचं दाखवलं आहे. वीएफएक्सच्या माध्यमातून हा साप दाखवण्यात आला आहे; जे काही नेटकऱ्यांना खटकलं आहे. ”सातव्या मुलीची सातवी मुलगी’मधला नाग आता झीवरच्या इतर सगळ्या मालिकांमध्ये वापर करणार वाटतं’, ‘झी मराठीच्या जुन्या मालिका चांगल्या होत्या. आताच्या मालिकांमध्ये काहीच नाही’, ‘काय फालतू मालिका आहे, बंद करा काहीही दाखवतात’, अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी ‘शिवा’ मालिकेच्या या सीनवर दिल्या आहेत.

हेही वाचा – “तुमच्या बरोबर झालंय का कधी असं?”, कुशल बद्रिकेने व्हेलेंटाइन डेनिमित्ताने लिहिलेल्या पोस्टने वेधलं लक्ष

एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, ‘कार्टून दाखवताय का लहान मुलांना?’ तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, ‘कार्टून पण यापेक्षा चांगल दाखवतात.’ तर तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, ‘ओव्हर अ‍ॅक्टिंग.’

दरम्यान, ‘शिवा’ ही मालिका ‘सिंदूरा बिंदू’ या ओडिया मालिकेचा रिमेक आहे. याआधी हिंदी भाषेत या मालिकेचा रिमेक झाला होता. ‘मीत’ असं हिंदीतल्या मालिकेचं नाव होतं. त्यानंतर आता मराठीत ही मालिका सुरू झाली आहे.

Story img Loader