छोट्या पडद्याचा चाहतावर्ग आजही मोठ्या प्रमाणात आहे. मराठी वाहिन्यांमध्ये नेहमीच टीआरपीसाठी चढाओढ सुरू असते. आता प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी ‘झी मराठी’ वाहिनीवर लवकरच दोन नव्या मालिका सुरू होणार आहेत. ‘शिवा’ आणि ‘पारू’ या मालिकेची झलक काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांना पाहायला मिळाली. परंतु, या मालिकांमधील सगळ्या कलाकारांची नावं अद्याप गुलदस्त्यात आहेत. ‘शिवा’ मालिकेसंदर्भात एक नवीन प्रोमो नुकताच ‘झी मराठी’ वाहिनीने प्रदर्शित केला आहे.

‘शिवा’ मालिकेच्या या नव्या प्रोमोमध्ये प्रेक्षकांना प्रमुख अभिनेत्याची झलक पाहायला मिळत आहे. परंतु, यामध्ये संबंधित अभिनेत्याचा चेहरा लपवण्यात आला आहे. आता हा अभिनेता नेमका कोण? आणि पूर्वा फडकेबरोबर मालिकेत महत्त्वाची भूमिका कोण साकारणार याकडे प्रेक्षकांचं लागलं आहे.

हेही वाचा : “कलाकार फार दु:खी असतात…”, प्राजक्ता माळी पोहोचली बंगळुरूच्या आश्रमात; श्री श्री रविशंकर यांना विचारला ‘तो’ प्रश्न

प्रेक्षकांनी कमेंट सेक्शनमध्ये या प्रोमोमधील अभिनेत्याला अगदी अचूक ओळखलं आहे. ‘शिवा’ मालिकेद्वारे तब्बल दोन वर्षांनी ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ फेम अभिनेता शाल्व किंजवडेकर पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पुन्हा पुनरागमन करणार आहे. काही दिवसांपूर्वीच शाल्वने मेकअप रुपमधील एक फोटो शेअर करत त्यामध्ये ‘झी मराठी’ला टॅग केलं होतं.

हेही वाचा : Video : चाळीतील एकोपा, सत्यनारायण पूजा, अन्…; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम निखिल बनेने दाखवली चाळ संस्कृतीची झलक

zee marathi
नेटकऱ्यांच्या कमेंट्स

दरम्यान, शाल्व किंजवडेकरने यापूर्वी ‘झी मराठी’च्या ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेत प्रमुख भूमिक साकारली होती. यामध्ये त्याच्यासह अभिनेत्री अन्विता फलटणकर मुख्य भूमिकेत झळकली होती. जानेवारी २०२१ मध्ये सुरू झालेल्या या मालिकेने १९ मार्च २०२२ रोजी प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्यामुळे पुन्हा एकदा शाल्वला छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.