अभिनेत्री शमिता शेट्टीचा एक्स बॉयफ्रेंड अभिनेता राकेश बापट हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्याचं समोर आलं आहे. त्यानं स्वतः सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करून याबाबत चाहत्यांना माहिती दिली. अचानक हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्याचं पाहून राकेशच्या चाहत्यांना धक्काच बसला. पण आता अभिनेत्यानं आणखी एक व्हिडीओ शेअर करून नेमकं काय झालं, याबाबतची माहिती दिली आहे.

हेही वाचा – Video: “…तेव्हापासून ३६ वर्षे मी दारुचा एक थेंब प्यायलो नाही”; महेश भट्ट यांनी बिग बॉस ओटीटीच्या घरातील सदस्यांना सांगितला ‘तो’ किस्सा

priyanka chopra rakesh roshan
“अंत्यसंस्कार सुरू असताना…”, प्रियांका चोप्राने सांगितलं ‘क्रिश’ चित्रपटासाठी तिची निवड कशी झाली, म्हणाली, “मला भीती वाटली…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
Viral Video Of Girls Hostel
आनंदच निराळा…! अंघोळीसाठी रांगा, केसांत ब्रश अन्… VIRAL VIDEO पाहून डोळ्यांसमोर येईल तुमची ‘हॉस्टेल लाईफ’
reelstar danny pandit got married to neha kulkarni
रीलस्टार डॅनी पंडितने केलं लग्न, त्याची ‘खऱ्या आयुष्यातील अर्धांगिनी’ पाहिलीत का?
Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो
siddharth chandekar took special ukhana for wife mitali
“मितालीचं नाव घेतो अन् गिफ्ट करतो…”, सिद्धार्थ चांदेकरने बायकोसाठी घेतला हटके उखाणा, पाहा व्हिडीओ
Chhoti Tara Tadoba , Tadoba Chhoti Tara Tiger Calf Video, Chhoti Tara Tiger,
VIDEO : ‘तिने’ सहावेळा मातृत्त्वाचा अनुभव घेतला, पण आता…

काल राकेश बापटनं इन्स्टाग्राम स्टोरीला एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यामध्ये त्याच्या हाताला सलाईन लावल्याचं दिसत होतं. आता राकेशनं दुसरा व्हिडीओ शेअर करत सांगितलं की, “मी काल एक व्हिडीओ पोस्ट केला होता. पण मला नक्की काय झालंय? याबद्दल मी काही सांगू शकलो नाही त्यासाठी सगळ्यांना सॉरी. मी सध्या शूटिंगनिमित्तानं दुबईत आहे. खूप उष्ण वातावरण आहे. त्यामुळे मला स्ट्रोक आला. ताप आहे. मी सध्या युएईमध्ये असून सुखरुप आहे. लवकरच मी पुन्हा काम करायला सुरुवात करेन. धन्यवाद, तुम्ही दिलेल्या शुभेच्छाबद्दल. तुमच्या प्रार्थना अशाच माझ्यासोबत असू द्या. तुम्ही सुद्धा तुमची काळजी घ्या.”

हेही वाचा – “मला लोक घाबरतात” स्वतःच्या प्रतिमेविषयी शरद पोंक्षेंचे वक्तव्य, म्हणाले, “…त्यामुळे माझी सटकते”

राकेश बापट बिग बॉस ओटीटीच्या पहिल्या पर्वात झळकल्यानंतर अधिक प्रसिद्धीझोतात आला होता. बिग बॉस ओटीटी या घरात राकेशचे अभिनेत्री शमिता शेट्टीबरोबर चांगलं बॉन्ड निर्माण झालं. त्यानंतर दोघांनी एकमेकांच्या भावना व्यक्त केल्या आणि ते दोघं रिलेशनशिपमध्ये आले. शोनंतर दोघं बरेच महिने एकत्र होते. परंतु २०२२च्या अखेरीस राकेश व शमिताचा ब्रेकअप झाला.

हेही वाचा – Video: लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? ‘बिग बॉस’ फेम सोनाली पाटील म्हणाली…

दरम्यान राकेशच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तो ‘तू आशिकी’, ‘बात हमारी पक्की है’, ‘कुबूल है’, ‘नच बलिए ६’ या शोमध्ये झळकला होता. तसेच ‘वो तुम बिन’, ‘दिल विल प्यार व्यार’, ‘कुछ दिल ने कहा’, ‘कोई मेरे दिल में है’ यांसारख्या चित्रपटात त्यानं काम केलं आहे. शिवाय राकेश मराठी चित्रपटातही दिसला होता.

Story img Loader