‘शार्क टँक इंडिया’ या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी दिलेला प्रतिसाद पाहता ‘शार्क टँक इंडिया’चं दुसरं सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमामध्ये इतर परीक्षकांमध्ये गजल अलगही परीक्षक म्हणून सहभागी झाली होती. पण दुसऱ्या सीझनमध्ये ती परीक्षक म्हणून दिसणार नसल्याचं समोर आलं. आता एका मुलाखतीदरम्यान गजलने काही आश्चर्यकारक खुलासे केले आहेत.
आणखी वाचा – अभिनेत्री सई ताम्हणकरचा पूर्वाश्रमीच्या पतीबाबत खुलासा, म्हणाली “त्या दिवशी रात्रभर दारू प्यायलो अन्…”
चेतन भगत यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये गजल म्हणाली की, “मी मुलंच सांभाळू शकत नाही तर व्यवसाय काय करणार? असं लोक मला सतत सुनवायचे. एक ब्लॉगर होती. तिने माझ्या ब्रँडचं प्रमोशन करावं असं मला वाटत होतं. पैसे न घेता तिने माझ्या ब्रँडचं प्रमोशन करावं म्हणून मी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होते.”
“जेव्हा मी त्या ब्लॉगरबरोबर बोलते होते तेव्हा माझा मुलगा माझ्या कुशीत होता. मी फोनवर बोलत असतानाच तो रडू लागला. याबाबत मी त्या ब्लॉगरची माफी मागितली. तू तुझं मुल सांभाळू नाही शकत तर व्यवसाय काय करणार? असं मला बोलण्यात आलं. आणि त्या ब्लॉगरने फोनच कट केला.”
आजही तिला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. गजल तिच्या पतीबरोबर रिल्स व्हि़डीओ जेव्हा बनवते आणि ते पोस्ट करते तेव्हा तिला सतत काम करण्याचा सल्ला दिला जातो. रिल्सचे बनवायचे आहेत तर एवढे पैसे कमावण्याची गरज काय? असंही तिला बोलण्यात येतं. याबाबत गजलने स्वतःच या मुलाखतीमध्ये सांगितलं. गजल मामा अर्थची सह संस्थापक आहे.