दिग्दर्शक संजय लीला भन्साळींचा ‘बाजीराव मस्तानी’ तुम्हाला आठवत असेल. या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेलं बाजीराव पेशवे यांचं रुप व इतिहास चर्चेचा विषय ठरला होता. पहिले बाजीराव पेशवे म्हटलं की, प्रत्येकाच्या मनात त्यापाठोपाठ मस्तानी हेच नाव येतं. पण ते एक पराक्रमी पेशवा होते हे आपण विसरून चालणार नाही. याचीच जाणीव पुन्हा एकदा अभिनेते शरद पोंक्षे यांनी करून दिली आहे.
शरद पोंक्षे आपल्या व्याख्यानासाठी महाराष्ट्रभर दौरा करत असतात. चित्रीकरणामधून वेळ काढत ते व्याख्यान करतात. यादरम्यानचे काही व्हिडीओ शरद पोंक्षे सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर करताना दिसतात. त्यांनी नुकताच शेअर केलेला व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
शरद पोंक्षे यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ते बाजीराव पेशवे यांच्याबाबत बोलत आहेत. मस्तानीवर प्रेम करणारे बाजीराव आपल्याला माहित आहेत त्याव्यतिरिक्त कोणतंच दुर्देव नसल्याचं त्यांनी म्हटलं. शिवाय बाजीराव पेशवे यांच्या पराक्रमाचीही त्यांनी आठवण करून दिली.
आणखी वाचा – “…म्हणून मी तुमची आई होत नाही”; माजी पॉर्नस्टार मिया खलिफा संतापली
२१ वर्षात ४२ लढाया लढले व एकही लढाई ते हारले नसल्याचं शरद पोंक्षे म्हणाले. पुढे शरद पोंक्षे म्हणाले, “बाजीराव पेशवे यांनी मनात आणलं असतं तर ते छत्रपतींची गादी बळकावू शकले असते पण त्यांनी असं केलं नाही. वयाच्या एकविसाव्या वर्षी पेशवे पद मिळालं आणि बेचाळीसाव्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला,” अशी माहिती शरद पोंक्षे यांनी त्यांच्या व्हिडीओद्वारे दिली.