सिनेसृष्टीत अनेक कलाकारांची मुलं हे त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत अभिनय क्षेत्राकडे वळलेली पाहायला मिळतात. तर काही कलाकार मंडळी मात्र याला अपवाद ठरताना पाहायला मिळत आहेत. मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या उत्तम अभिनय शैलीमुळे प्रेक्षकांची मनं जिंकणारे अभिनेते शरद पोंक्षे. अनेक चित्रपट, नाटक आणि मालिका यांच्या माध्यमातून त्यांनी कायमच प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. वैविध्यपूर्ण भूमिका साकारणारे शरद पोंक्षे हे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. आता अभिनेते शरद पोंक्षे यांनी लेकीसाठी खास पोस्ट लिहित तिच्याबद्दलचा अभिमान व्यक्त केला आहे.

शरद पोंक्षे यांची मुलगी सिद्धी वैमानिक होण्याचं शिक्षण घेण्यासाठी परदेशात गेली होती. त्यावेळी त्यांनी सिद्धी परदेशात शिकण्यासाठी जात असताना विमानतळावरचे काही फोटो शेअर करत तिच्यासाठी एक भावूक पोस्ट केली होती. त्यात त्यांनी ‘पिल्लू निघालं वैमानिक व्हायला’ असं लिहिलं होतं. आता तिचं ते स्वप्न पूर्ण झालं आहे.

marathi actress suhas joshi
व्यक्तिवेध: सुहास जोशी
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
mridula tripathi pankaj tripathi
जिच्यासाठी मुलगा पाहायले गेला, तिच्याशीच नंतर केलं लग्न; बॉलीवूड अभिनेत्याची फिल्मी लव्ह स्टोरी, पत्नीला ठेवलेलं मुलांच्या वसतिगृहात
Manoj Bajpayee on being stereotyped as middle class No director could think of me as a rich guy experts share ways to deal with rejection
“कोणताही दिग्दर्शक माझा श्रीमंत व्यक्ती म्हणून भूमिकेसाठी विचार करत नाही..”; मनोज बाजपेयींना असे का वाटते? तज्ज्ञांनी केला खुलासा
vivek agnihotri instagram
मॅनेजर उद्धट वागल्याने मुख्य अभिनेत्याला चित्रपटातून काढलं, विवेक अग्निहोत्रींचा खुलासा; म्हणाले, “स्टार किडच्या…”
Loksatta vyaktivedh Madhura Jasraj Paraphrase of V Shantaram autobiography movie
व्यक्तिवेध: मधुरा जसराज
Simi Garewal slams trolls defends Amitabh Bachchan
अमिताभ बच्चन मुलगी अन् सून ऐश्वर्या राय यांच्यात भेदभाव करतात? ‘त्या’ व्हिडीओवर दिग्गज अभिनेत्री कमेंट करत म्हणाली…
Dev Anand Birth Anniversary
Dev Anand : ‘मै जिंदगी का साथ निभाता चला गया!’ चॉकलेट हिरो देव आनंद यांना आठवताना!

आणखी वाचा : “पायाजवळ घोणस आली आणि…”; उमा पेंढारकरने सांगितला शूटिंगदरम्यानचा चित्तथरारक अनुभव

नुकतीच ती एका प्रायव्हेट विमानाची पायलट झाली. ही आनंदाची बातमी शरद पोंक्षे यांनी सोशल मीडियावर शेअर केली. सिद्धीचा एक फोटो आणि व्हिडिओ फेसबुकवर शेअर करत शरद पोंक्षे यांनी लिहिलं, “सिद्धी शरद पोंक्षे आज प्रायव्हेट पायलट झाली. असंख्य अडचणीतून मार्ग काढत ती इथपर्यंत पोहोचली. अभिनंदन सिद्धी…”

सिद्धी पोंक्षे ही लहानपणापासूनच शालेय शिक्षणात हुशार होती. बारावीमध्ये असताना तिने विज्ञान शाखेत ८७ टक्के गुण मिळवले होते. त्यावेळीही शरद पोंक्षे यांनी एक पोस्ट शेअर केली होती.

हेही वाचा : “१०६ वर्षांची पेशवाई फक्त…”; शरद पोंक्षेंचं बाजीराव पेशवेंबद्दलचं वक्तव्य चर्चेत

त्यावेळी लेकीच्या कौतुकात त्यांनी म्हटलं होतं की, ‘२०१९ साली माझे कर्करोगावरील उपचार चालू होते. रुग्णालयामध्ये येऊन कॉलेजचा अभ्यास करून एवढ्या टेंशनमध्ये असतानाही पिल्लूनं ८७ टक्के मार्क १२ विज्ञान शाखेत मिळवले. अभिमान वाटला मला आणि सतत वाईट बातम्या चहूबाजूनी येत असताना एवढी चांगली बातमी सांगायला आनंद होतोय’, असं त्यांनी या पोस्टमध्ये लिहिलं होतं. आता शरद पोंक्षे यांच्या पोस्टमधून सिद्धी वैमानिक झाल्याचे कळतात तिच्यावर सर्वजण अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.