Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व आता शेवटाकडे आलं आहे. महाअंतिम फेरीला अवघे काही दिवस बाकी राहिले आहेत. ६ ऑक्टोबरला ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा महाअंतिम सोहळा रंगणार आहे. त्यामुळे आता अभिजीत सावंत, सूरज चव्हाण, निक्की तांबोळी, वर्षा उसगांवकर, पंढरीनाथ कांबळे, जान्हवी किल्लेकर, धनंजय पोवार आणि अंकिता वालावलकर या सदस्यांमधून कोण विजेता होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
नुकताच ‘बिग बॉस मराठी’च्या घरात फॅमिली वीक पाहायला मिळाला. या फॅमिली वीकमध्ये सदस्यांच्या कुटुंबातील मंडळी त्यांना भेटली. यावेळी कुटुंबातील मंडळींनी सदस्यांना त्यांना बाहेर दिसणाऱ्या खेळाविषयी सांगितलं. काय चुकतंय, काय बरोबर आहे हे सांगून सदस्यांना खेळण्यासाठी आणखी बळ दिलं. यावेळी सदस्य कुटुंबातील मंडळींना पाहून भावुक झाल्याचे दिसले. याआधी ‘बिग बॉस मराठी’च्या घरात लोकप्रिय राशीचक्राकर शरद उपाध्ये गेले होते. हे आता ‘आठवड्याचा Extra कल्ला’मध्ये पाहायला मिळणार आहे. नुकताच याचा प्रोमो समोर आला आहे.
काही दिवसांपूर्वी शरद उपाध्ये ‘बिग बॉस मराठी’च्या घरात गेल्याचा प्रोमो ‘कलर्स मराठी’च्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. पण काही मिनिटांत तो डिलीट करण्यात आला. त्यानंतर आज ( २८ सप्टेंबर ) शरद उपाध्येंचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये घरातील सदस्य शरद उपाध्येंना विविध प्रश्न विचारताना दिसत आहेत.
या प्रोमोमध्ये सुरुवातीला ‘बिग बॉस’ शरद उपाध्येंचं स्वागत करत आहेत. त्यानंतर पंढरीनाथ त्यांना प्रश्न विचारतो की, सूरज यांचं लग्न ठरत नाहीये. यांच्या लग्नाचा नेमका कधी योग्य आहे? त्यावर शरद उपाध्ये मजेशीर आणि जबरदस्त उत्तर देतात. ते म्हणतात की, मी मुलगी असतो तर यांना सोडलं नसतं. त्यावर सगळे सदस्य जोरजोराने हसायला लागतात. त्यानंतर पंढरीनाथ पुढचा प्रश्न विचारतो, फायनलपर्यंत कोणती रास जाईल? तेव्हा शरद उपाध्ये म्हणतात, “बिग बॉस मला केव्हातरी आपली रास जाणून घ्यायची आहे.”
हेही वाचा – ‘बिग बॉस मराठी ५’ फक्त ७० दिवसांत का संपतंय? छोटा पुढारीचं मोठं वक्तव्य; म्हणाला, “शोला टीआरपी देणारेच…”
राशीचक्रकार शरद उपाध्येंबरोबर रंगलेला हा भाग रात्री ९ वाजता नाही तर उद्या ( २९ सप्टेंबर ) दुपारी १ वाजता पाहता येणार आहे. दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’च्या घरात राखी सावंत आणि अभिजीत बिचुकलेची एन्ट्री झाली आहे. त्यामुळे या दोघांच्या एन्ट्रीने घरात काय धुमाकूळ होतोय हे पाहणं उत्सुकेत आहे.
© IE Online Media Services (P) Ltd