‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘पारू’ मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. अभिनेत्री शरयू सोनावणे आणि अभिनेता प्रसाद जवादे यांची प्रमुख भूमिका असलेली ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. या मालिकेतील नवनवीन ट्विस्टने प्रेक्षकांना चांगलंच खिळवून ठेवलं आहे. पण, तुम्हाला पारू म्हणजेच अभिनेत्री शरयू सोनावणेची सेटवरील जवळची व्यक्ती माहितीये का? तर जाणून घ्या…

नुकतंच ‘पारू’ मालिकेला वर्ष पूर्ण झालं. १२ फेब्रुवारीला मालिकेच्या वर्षपूर्तीनिमित्ताने कलाकारांनी केक कापून सेलिब्रेशन केलं. तसंच यावेळी पारूचा ३० फुट उंच पोस्टर लॉन्च करण्यात आला. एवढंच नव्हे तर दिशाची एन्ट्रीदेखील पाहायला मिळाली. ‘पारू’ मालिकेच्या वर्षपूर्तीनिमित्तानेच शरयू सोनावणेने माध्यमांशी संवाद साधला. यावेळी तिने सेटवरील जवळच्या व्यक्तीबद्दल सांगितलं.

‘अल्ट्रा मराठी बझ’ या एंटरटेनमेंट युट्यूब चॅनेलशी संवाद साधताना पारूला विचारलं की, सेटवरची खास व्यक्ती, जी जवळची वाटते. ती व्यक्ती कोण आहे? यावर शरयू सोनावणे उत्तर देत म्हणाली, “सेटवरील सगळेच कलाकार माझे खास आहेत. आम्ही सगळे कुटुंबासारखे एकत्र असतो. पण, त्यात ही असं सांगायचं झालं की, सुट्टी असेल तर कोणत्या व्यक्तीची आठवण येते? तर ती व्यक्ती आहे प्राजक्ता वाड्ये म्हणजेच माझी सावित्री आत्या. ऑनस्क्रीन आम्ही पारू आणि सावित्री आत्याचा एक गट असतो. तसंच आमचं ऑफस्क्रीनसुद्धा आहे. तिलाही माझी आठवण येते आणि मलाही तिची आठवण येते. त्यामुळे असं आम्हाला वाटतं, आमचं एकमेकींशिवाय पान हालत नाही. म्हणूनच सेटवरची सगळ्यात जवळची व्यक्ती म्हणजे सावित्री आत्या आहे.”

‘पारू’ मालिकेत सध्या काय सुरू आहे?

किर्लोस्कर कंपनीची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर पुन्हा एकदा पारू झाली आहे. यावेळी पारू धाडसाने अनुष्काला सामोरे जाऊन ठामपणे म्हणते की, पंधरा दिवसांच्या आता मी तुला किर्लोस्कर घरातून बाहेर फेकून देईल. त्यामुळे दोघींच्या शत्रुत्वाला आणखी धार आली आहे. तर दुसऱ्या बाजूला तुरुंगातून बाहेर आलेली दिशा किर्लोस्कर उद्योगसमूहाविरुद्ध प्रतिस्पर्धी कंपनी सुरू करते. ज्यामुळे त्यांच्या व्यवसायाला मोठा धोका निर्माण होतो. म्हणून अहिल्या चिंतेत आणि विचारात आहे की आदित्य या कठीण स्पर्धेला कसा सामोरा जाईल?

Story img Loader