‘शार्क टँक इंडिया’ चे तिसरे पर्व सध्या चालू आहे. या शोच्या ताज्या भागात एनर्जी बार ब्रँड ‘राइज’ च्या दोन २१ वर्षीय संस्थापकांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी त्यांच्या व्यावसायिक धोरणाबद्दल आणि अनुभवाबद्दल दिलेल्या माहितीवरून शार्क गोंधळल्याचं पाहायला मिळालं. सनी लिओनीला गुंतवणूकदार आणि ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून कंपनीत घेतलं आहे, असं संस्थापकांनी सांगितलं. तसेच त्यांनी ४५ लाखांच्या बदल्यात शार्क्सना सहा टक्के भागीदारी ऑफर केली आणि कंपनीचे मूल्य ७.५ कोटी आहे, असा दावा केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संस्थापकांची ही ऑफर पाहून नमिता थापर यांचा पहिला प्रश्न होता की ते ‘प्री-रेव्हेन्यू’ असूनही कंपनीची एवढी मोठी व्हॅल्यूएशन कशी सांगू शकतात. त्यावर संस्थापकांनी म्हणाले की त्यांनी सनी लिओनीला ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून घेतलंय, त्यामुळे ब्रँडची व्हॅल्यूएशन लक्षणीय वाढते, तसेच त्यांच्या उत्पादनांमध्ये कॅफीन आणि टॉरिन आहे, हा त्यांचा यूएसपी आहे. सनी आणि तिचे पती डॅनियल वेबर यांना त्यांनी किती भागीदारी दिली, असं विचारलं असता ते म्हणाले, “आम्ही २.५ कोटी रुपयांच्या व्हॅल्यूएशनवर ३० लाख रुपये घेतले आहेत, त्याबदल्यात त्यांना १२ टक्के भागीदारी दिली आहे.”

प्रियांका चोप्राची बहीण होणार केजरीवालांची सून, राजस्थानमध्ये शाही सोहळ्यात मीरा बांधणार लग्नगाठ

संस्थापक कंपनीची व्हॅल्यूएशन अडीच कोटींवरून थेट साडेसात कोटी रुपयांपर्यंत कसे वाढवू शकतात, हेच नमिता यांना पटलं नाही. “एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत ही व्हॅल्यूएशन तिप्पट झाली. असं का? त्यात काहीतरी लॉजिक असायला हवं. एकतर तुमच्याकडे बॅकअप म्हणून विक्री असायला पाहिजे किंवा तुम्ही नवीन डिस्ट्रीब्युशन चॅनेल शोधायला पाहिजे. तिप्पट व्हॅल्यूएशन सांगताना ते सिद्ध करण्यासाठी काहीतरी असायला हवं,” असं नमिता म्हणाल्या. तसेच त्यांचे प्रोडक्ट्स खूप महाग असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

“तुम्हाला आमचे वडील म्हणणं…”, नितीश भारद्वाज यांनी सांगितली मुलीची प्रतिक्रिया; तिसऱ्या लग्नाबद्दल म्हणाले, “मी…”

अमन गुप्ता म्हणाला की त्याला या उत्पादनांमध्ये विशेष काही वाटत नाही. तसेच मी ब्रँड, उत्पादनं की संस्थापक यांच्यापैकी कशात गुंतवणूक करायची? असंही त्याने विचारलं. त्यावर त्या तरुणांनी संस्थापकांमध्ये असं म्हटलं. “चार महिन्यांत आम्ही आमची कल्पना प्रत्यक्षात उतरवली आहे, इतकंच नाही तर कंपनीत एक सेलिब्रिटी ब्रँड ॲम्बेसेडर आणला आणि आता आम्ही शार्क टँकवर आहोत, त्यामुळे तुम्ही आमच्यात गुंतवणूक करा,” असं ते म्हणाले.

“तो डुकराप्रमाणे खातो आणि श्वानासारखा…”, प्रसिद्ध अभिनेत्याचे सलमान खानबद्दल विधान; म्हणाला, “त्याच्या वडिलांनी…”

अमनचं या उत्तराने समाधान झालं नाही. त्याने विचारलं, जेव्हा तुम्ही कंपनीची भागीदारी द्यायचा विचार करता तेव्हा कोणाचा सल्ला घेता? ते म्हणाले, “आमच्या अकाऊंटंटचा”. त्यावर अमन म्हणाला, “कंपनीची भागीदारी तेही इतक्या लगेच, कंपनीने आता कुठे आगेकूच करायला सुरुवात केली आहे अशा टप्प्यावर १२ टक्के हिस्सा ३० लाखात हा व्यवहार पटत नाही. तुम्ही याबाबत अधिक गांभीर्याने विचार करायला हवा होता असं वाटत नाही का? तुम्ही अजून थोडी दुनियादारी शिकला असता. मला तुमच्यात बिझनेस सेन्स दिसत नाही. मी २१ व्या वर्षी माझा पहिला व्यवसाय सुरू केला, तो अयशस्वी झाला, पण त्यातून मला खूप काही शिकायला मिळालं. तुमचा व्यवसाय देखील अयशस्वी होईल, परंतु तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल. माझ्या दृष्टीने आता तुम्ही आहात अनफिट आहात, पण हा व्यवसाय तुम्हाला या क्षेत्रातले खरे खेळाडू कसे व्हायचं ते शिकवेल.”

अमन गुप्ता संस्थापकांच्या जिद्दीने खूप प्रभावित झाला आणि त्याने मार्गदर्शक व्हायची ऑफर दिली. शेवटी राइजचे उद्योजक कोणतीही डील न घेता शोमधून बाहेर पडले.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shark tank india 3 aman gupta says founders made mistake by giving shares to sunny leone for 30 lakh hrc