गेल्यावेळेप्रमाणेच यावर्षीसुद्धा ‘शार्क टँक इंडिया’चा दूसरा सीझन चांगलाच गाजला. यावेळी अशनीर ग्रोव्हर आणि त्याचे धमाल सल्ले नसूनही हा नवा सीझनही तितकाच मनोरंजक झाला. या कार्यक्रमामुळे यातील परीक्षक म्हणून भूमिका बजावणाऱ्या शार्क्सच्या आयुष्यातही बरेच बदल झाले. या कार्यक्रमामुळे त्यांच्या लोकप्रियतेत आणखी भर पडली. याच शोचा एक लोकप्रिय असा शार्क अनुपम मित्तल सध्या चर्चेत आहे.

अनुपम हे शादी.कॉम आणि इतर काही बड्या कंपनीचे सीइओ आहेत. अनुपम सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. त्यांच्या खासगी आयुष्यातील अपडेट ते त्यांच्या चाहत्यांना देत असतात. नुकतंच अनुमप यांनी त्यांच्या हाताला झालेल्या गंभीर दुखापतीविषयी सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून माहिती दिली आहे.

Premachi Goshta fame komal Balaji and Sanjivani Jadhav dance on asha Bhosale song
Video: ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील इंद्राचा लेकीबरोबर आशा भोसलेंच्या ‘या’ लोकप्रिय गाण्यावर भन्नाट डान्स, पाहा व्हिडीओ
Punha Kartya Aahe
Video : हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमात शिवा-वसुंधरा एकत्र येणार; तनयाचा…
Marathi actress Vishakha Subhedar share special post for husband Mahesh subhedar
“कुटुंबाच्या जबाबदाऱ्या सांभाळून…”, विशाखा सुभेदारची पतीसाठी खास पोस्ट; म्हणाली, “तू दाही दिशांना…”
Shivani Sonar & Ambar Ganpule Wedding date news
शिवानी-अंबरच्या लग्नपत्रिकेची पहिली झलक आली समोर, ‘या’ दिवशी अडकणार विवाहबंधनात, पार पडला मेहंदी सोहळा
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “रानी माझ्या मळ्यामंदी…”, तुळजा-सूर्याचा मकरंद अनासपुरेंच्या गाण्यावर भन्नाट डान्स; पाहा BTS सीन
mugdha vaishampayan prathamesh laghate first makar sankrant photos viral
मुग्धा वैशंपायन-प्रथमेश लघाटेने ‘अशी’ साजरी केली पहिली मकरसंक्रांत, फोटो झाले व्हायरल
Bigg Boss 18 Vivian Dsena angry on karan veer Mehra roasting
Bigg Boss 18: दोन वर्षांच्या मुलीवरून खिल्ली उडवल्यामुळे विवियन डिसेना भडकला करणवीर मेहरावर, रागातच्या भरात केलं ‘हे’ कृत्य
Bigg Boss 18 Grand Finale Karan Veer Mehra Vivian Dsena Perform with Shilpa shirodkar
Bigg Boss 18: “ये बंधन तो…”, करण-विवियनचा शिल्पासह जबरदस्त परफॉर्मन्स, बहीण नम्रता शिरोडकर म्हणाली…
Bigg Boss 18 chum darang slam on karanveer Mehra watch video
Bigg Boss 18: “तुला गर्लफ्रेंड नाहीतर…”, चुम दरांगने करणवीर मेहराची उडवली खिल्ली, पाहा व्हिडीओ

आणखी वाचा : Video : सिद्धार्थ जाधवकडून अशोक सराफ यांना अनोखी मानवंदना; केलं असं काही की सगळ्यांच्या डोळ्यात आले आनंदाश्रू

अनुपम यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटच्या माध्यमातून याविषयी माहिती दिली आहे. ते रुग्णालयातील बेडवर आराम करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ पोस्ट करताना त्यांनी लिहिलं, “जेव्हा तुमचं ध्येय तुमच्यापासून आणखी लांब जातं तेव्हा आणखी जास्त मेहनत करा. गेली बरीच वर्षं शरीरावर मेहनत घेत आहे, पण जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीच्या मागे हात धुवून लागता आणि ती तुम्ही तुमच्या ध्येयाच्या अगदी जवळ असता तेव्हा नियती किंवा आयुष्य तुम्हाला पुन्हा आहे त्या जागी आणून ठेवतं. अपयशाच्या बाबतीत आपण काहीच करू शकत नाही, फक्त पुन्हा नव्या उमेदीसह उभं राहणंच आपल्या हातात असतं.”

अनुपम मित्तल यांची हि पोस्ट पाहून चाहते त्यांच्या तब्येतीसाठी प्रार्थना करत आहेत. अनुपम ‘शादी.कॉम’सह ‘मकान.कॉम’, ‘मौज मोबाईल’ अशा विविध कंपन्यांचे सर्वेसर्वा आहेत. याबरोबरच इतरही वेगवेगळ्या उद्योगात अनुपम यांनी शार्क टँकच्या माध्यमातून गुंतवणूक केलेली आहे. ‘शार्क टँक इंडिया’मुळे त्यांच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली. इंस्टाग्रामवर त्यांचे १.३ मिलियन फॉलोअर्स आहेत.

Story img Loader