‘शार्क टॅंक इंडिया’चा पहिलं पर्व खूप गाजलं. त्यानंतर आता ‘शार्क टँक इंडिया’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सीझनची जबरदस्त चर्चा आहे. या कार्यक्रमात नवीन व्यवसायिक त्यांच्या बिझनेसच्या कल्पना घेऊन जज शार्क्सना सांगतात आणि शार्क्सना जर त्यांच्या व्यवसायात रस वाटलं तर ते त्यांच्या व्यवसायात पैसे गुंतवतात. यात अनेक नव्या कल्पना घेऊन स्पर्धक सहभागी होत आहेत. अनेकांच्या बिझनेसबाबतच्या कल्पना ऐकून परीक्षक आवाक् होत आहेत. आता अशातच अमित जैन याने एका स्टार्टअपला सगळ्यात मोठी ऑफर देऊ केली. पण त्या स्टार्टअपच्या संस्थापकाने ती नाकारली.
शोमध्ये नमिता थापर, विनीता सिंग, अनुपम मित्तल, पियुष बंसल, अमन गुप्ता आणि अमित जैन हे ‘शार्क टँक इंडिया २’च्या परीक्षकाच्या खुर्चीत बसले आहेत. आतापर्यंत या सीझनमध्ये हटके आणि भारी कल्पना घेऊन आलेल्या अनेकांना जबरदस्त डील्स मिळाल्या. त्याचबरोबर स्पर्धकांच्या हुशारीने परीक्षकांना अचंबित केलं. आता या स्पर्धेत सहभागी झालेल्या दिल्लीतील अंकित अग्रवालची सर्वत्र चर्चा आहे.
नुकत्याच झालेल्या भागात दिल्लीतील अंकित अग्रवाल नावाचा तरुण उद्योजक त्याची बिझनेस आयडिया घेऊन आला होगा. ‘Unstop’ असं त्याच्या स्टार्टअपचं नाव आहे. हे एक टॅलेंट मॅनेजमेंट स्टार्टअप आहेत. ही कंपनी विद्यार्थ्यांना नोकरी देण्याचं काम करते. त्याने मांडलेल्या बिझनेस आयडियाने सर्वजण आवाक् झाले. सुरुवातीला त्याने १ कोटींच्या बदल्यात १ टक्के भागीदारी अशी ऑफर शार्कसमोर ठेवली होती.
त्याला पाचही परिक्षकांना त्याच्या कंपनीत सहभागी करून घ्यायचं होतं. पण अमित जैनने त्याला स्वतंत्रपणे दिली. त्याने अंकितला ५ कोटींच्या बदल्यात १० टक्के भागीदारी अशी ऑफर दिली. पण अमितने ही ऑफर नाकारली. त्याने दिलेल्या नकाराने प्रेक्षकही आश्चर्यचकित झाले. अखेर अमन, नमिता, अनुपम आणि अमित एकत्र आले आणि त्यांनी त्याला ऑफर दिली जी अंकितने मान्य केली. आता त्याची सर्वत्र चर्चा होत आहे.