चेन्नईतील एका उद्योजिकेने ‘शार्क टँक इंडिया’च्या नव्या एपिसोडमध्ये मुलांच्या स्किनकेअर आणि हेअरकेअर ब्रँड ‘टिकिटोरो’काय आहे याची माहिती दिली. प्रसन्ना असे या उद्योजिकेचे नाव आहे. ती स्वतः एक आई आहे, तिने सांगितले की, ३ ते १६ वयोगटातील मुलांसाठी शॅम्पू आणि लोशन यांसारखी उत्पादने बाजारात कमी उपलब्ध असल्याचे लक्षात घेऊन तिला हा ब्रँड सुरू करण्याची प्रेरणा मिळाली. बाळांसाठी उत्पादने बाजारात असली तरी मोठ्या वयाच्या मुलांसाठी तितक्या पर्यायांची कमतरता आहे, असे तिने सांगितले. तिने तिच्या कंपनीसाठी ०.५% इक्विटीच्या बदल्यात २५ लाख रुपयांची मागणी केली, ज्यामुळे ‘टिकीटोरो’चे मूल्य ५० कोटी रुपये ठरले. या एपिसोडमध्ये नमिता थापर, अनुपम मित्तल, विनीता सिंग, कुणाल बहल आणि पियुष बन्सल हे ‘शार्क्स’च होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रसन्नाने सांगितले की, सात वर्षे वंधत्वावर उपचार घेतल्यानंतर तिला मूल झाले. व्यवसाय सुरू करण्यापूर्वी ती १४ वर्षे गृहिणी होती. तिने सांगितले की, गृहिणी असताना मिळालेला अनुभव तिला सर्व प्रकारच्या व्यवसाय व्यवस्थापनामध्ये कामी आला. तिने अभियांत्रिकीची पदवी घेऊन नंतर एमबीए केले आहे. तिच्या कंपनीने पहिल्या वर्षी ६ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले, पण त्यानंतरच्या वर्षात ते ३००० टक्क्यांनी वाढले. यावर्षी कंपनीचे १७ कोटी रुपयांचे उत्पन्न होईल, असे तिने सांगितले, पण कंपनी अजूनही सगळा खर्च चालवत असल्याचे तिने स्पष्ट केले.

प्रसन्नाने पुढे सांगितले की, कंपनीसाठी तिने आतापर्यंत बाहेरून कुठलाही निधी गोळा केलेला नाही. व्यवसायासाठी लावलेले संपूर्ण पैसे वैयक्तिक बचतीतून आले आहेत. तिचे पती स्टील मॅन्युफॅक्चरिंग व्यवसायात असून त्यांनी ‘टिकिटोरो’ या व्यवसायात आतापर्यंत १४ कोटी रुपये गुंतवले आहेत, तसेच अजून ५ कोटी रुपये गुंतवण्याची तयारी असल्याचे तिने सांगितले. यापैकी ६.५ कोटी रुपये इन्व्हेंटरीसाठी खर्च करण्यात आले. शिपिंग संकटामुळे व्यवसाय अडचणीत आला असताना ती इन्व्हेंटरी न ठेवण्याचा धोका पत्करू शकत नव्हती, असेही ती म्हणाली.

कुणालने विचारले, “तुम्ही तुमच्या वैयक्तिक पैशातून इतकी मोठी गुंतवणूक का केली आहे?” यावर प्रसन्नाने उत्तर दिले, “तुम्ही म्हणत आहात तशी परिस्थिती अगदीच गंभीर नाही,” आणि आमचा व्यवसाय सकारात्मक दिशेने जात असल्याचे स्पष्ट केले.

पण विनीता यांना हे पटले नाही. त्या म्हणाल्या, “अशा प्रकारच्या व्यवसायात १२ महिने पुरेल इतकी इन्व्हेंटरी (उत्पादन तयार करण्यासाठी लागणारा माल) ठेवणे म्हणजे आर्थिक आत्महत्या आहे. हे असं करणं म्हणजे रोख पैसा अडकवण्याची चूक करणे आहे.” पियुष यांनीही याला सहमती दर्शवली. ते म्हणाले, “पैशाच्या सततच्या पुरवठ्यामुळे तुम्ही बिघडले आहात.” प्रसन्ना फ्रीलान्स कन्सल्टंट्सवर महिन्याला २० लाख रुपये खर्च करत असल्याचे समजल्यावर पियुष म्हणाले, “तुमचा कन्सल्टंट्सचा खर्च बंद करा. तुम्हाला शिकण्याची भूक असलेली टीम आणि तुम्हाला शिस्त लावणारा कोणी तरी हवा आहे..”

पियुष, कुणाल आणि अनुपम यांनी डीलमधून माघार घेतली, पण विनीता यांनी ५% इक्विटीसाठी २५ लाख रुपयांची ऑफर दिली आणि तिने आणखी २ कोटी रुपये व्यवसायात गुंतवू नयेत अशी अट घातली. नमिता यांनी १% इक्विटीसाठी २५ लाख रुपयांची ऑफर दिली, पण यासाठी १७ कोटींच्या विक्रीचे लक्ष्य गाठण्याची खात्री आणि मूळ रक्कम परत मिळेपर्यंत ०.५% रॉयल्टीची अट ठेवली. प्रसन्ना या ऑफर्समुळे आनंदी झाली आणि तिने शेवटी नमिता यांची ऑफर स्वीकारली.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shark tank india pitcher spent 14 crore of husband money in a skinkare business vinita sing criticise her psg