भारतात रीयालिटि शोची चांगलीच क्रेझ आहे. मध्यंतरी आलेल्या ‘शार्क टँक इंडिया’ हा कार्यक्रम चांगलाच चर्चेत आला होता. परदेशी शोचं भारतीयकरण केलेला हा कार्यक्रम चांगलाच गाजला. यशस्वी स्टार्ट-अप कंपन्यांचे मालक यामध्ये परीक्षक म्हणून भूमिका बजावायचे आणि येणाऱ्या स्पर्धकांच्या नवनव्या उद्योग संकल्पनेमध्ये ते पैसे गुंतवायचे. या कार्यक्रमातून बिझनेसच्या नवीन संकल्पना समोर यायच्या.
आता या कार्यक्रमाचा दूसरा सीझनसुद्धा लवकरच सुरू होणार आहे. सोनी टेलिव्हिजनच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून नुकताच याच्या दुसऱ्या सीझनचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. अशनीर ग्रोव्हर आणि गजल अलाघ या दोघांची या कार्यक्रमातून उचलबांगडी झाली असून त्याऐवजी ‘कार देखो’ या ऑनलाइन पोर्टलचे को फाऊंडर आणि सीइओ अमित जैन यांची वर्णी लागली आहे. या पोर्टलवरून वापरलेल्या चारचाकी वाहनांची खरेदी विक्री करता येते.
आणखी वाचा : “मीडिया ट्रायलने…” पॉर्नोग्राफी प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या राज कुंद्राने सोडलं मौन
अशनीर ग्रोव्हर वादग्रस्त प्रकरणामुळे आणि त्याचया फटकळ स्वभावामुळे ओळखला जात असे. त्यामुळे या नव्या सीझनमध्ये त्याची उणीव नक्कीच प्रेक्षकांना भासेल. अमित जैनने आयआयटी दिल्लीमधून शिक्षण घेतलं असून त्याने काही काळ ऑस्टिन आणि टेक्ससमध्ये नोकरी केली आणि त्याने तिथेच एक स्टार्टअप सुरू केला होता. नंतर २००७ मध्ये त्याने त्याच्या भावाच्या मदतीने ‘कार देखो’ची सुरुवात केली.
एका टॉकशोमध्ये अमितला कठीण निर्णय घेताना मानाचं ऐकलं पाहिजे की डोक्याचं असं जेव्हा विचारलं गेलं तेव्हा तो अमित म्हणाला, “मी खरंतर दोन्ही गोष्टींचा विचार करतो, जेव्हा लोकांबद्दल निर्णय घ्यायचा असतो तेव्हा मी मनाने विचार करतो, आणि जेव्हा व्यवसायाशी निगडीत जेव्हा कोणता निर्णय घ्यायचा असेल तर मी डोक्याने विचार करतो.” अमित जैन सोडल्यास बाकी जून शार्क्स या नव्या सीझनमध्ये पाहायला मिळणार आहेत. ‘शादी.कॉम’चे अनुपम मित्तल, ‘लेन्सकार्ट’चे पीयूष बंसल, ‘बोट’ कंपनीचे अमन गुप्ता हेसुद्धा या नव्या सीझनमध्ये पुन्हा दिसणार आहेत.