दिवाळीचा सण म्हणजे सर्वांसाठी उत्साहाचा सण असतो. हा सण अनेकविध पद्धतींनी साजरा केला जातो. फटाके फोडले जातात. मात्र, अनावधानाने यातून अपघातदेखील होताना पाहायला मिळतात. आता ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेतील दुर्गाची भूमिका निभावणारी अभिनेत्री शर्मिला शिंदेने एक आठवण सांगितली आहे.

…आणि बॉम्ब हातात फुटला; शर्मिला शिंदेने सांगितला किस्सा

झी मराठी वाहिनीने एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये शर्मिला शिंदे तिच्या लहानपणीचा एक किस्सा सांगताना दिसत आहे. शर्मिलाने या व्हिडीओमध्ये म्हटले, “दिवाळी सगळ्यांचा आवडीचा सण झालेला आहे. माझाही हा खूप आवडीचा सण आहे. जेव्हा मी फटाके उडवायचे तेव्हाचा हा किस्सा आहे. फटाका हातातच लावायचा आणि पेटत आला की फेकायचा, असा एक प्रकार तेव्हा नवीनच आला होता. आता बहुतेक लोक असं करतात; पण तेव्हा हे नवीन नवीन आलं होतं. तर तो मी एक चौकोनी फटाका; जो सगळ्यात जास्त आवाज करणारा त्याला काही अॅटम बॉम्ब, असं काहीतरी म्हणतात. तो हातामध्ये पेटवला, इतकी मी धाडसी होते. आणि मी थांबले होते. तो पेटत आला होता आणि नेमकी मी तो फेकणार तेव्हाच माझ्या आईच्या मैत्रिणीच्या मुलानं मला हाक मारली.”

Bigg Boss Marathi Fame Abhijeet Sawant and her wife met yogita Chavan Nikhil damle
‘बिग बॉस मराठी’ फेम योगिता चव्हाणच्या घरी पोहोचला अभिजीत सावंत, पत्नी शिल्पा सावंत फोटो शेअर करत म्हणाली…
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
rajeshwari kharat fandry fame actress shares photo with somnath awaghade
‘फँड्री’तील शालू-जब्या गुपचूप लग्नबंधनात? राजेश्वरी खरातच्या ‘त्या’ फोटोवर कमेंट्सचा पाऊस; नेटकरी म्हणाले, “हे कधी झालं…”
prithvik pratap and prajakta dated each other for 11 years
तब्बल ११ वर्षांचं प्रेम, प्राजक्ताची साथ ते लग्न! पृथ्वीक प्रतापने लग्नाबद्दल स्वत:च केला खुलासा; म्हणाला, “२०१३ पासून…”
Amit Thackeray on Eknath Shinde
Amit Thackeray : “धनुष्यबाण आणि पक्षनाव घेऊन एकनाथ शिंदेंनी चूक केली”, शिवसेनेतील बंडखोरीवरील अमित ठाकरेंची प्रतिक्रिया चर्चेत!
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
sai tamhankar arrange diwali pahat for loved ones
मुंबईत ४५ व्या मजल्यावर आहे सईचं आलिशान घर! लेकीच्या घरी आली लाडकी आई; ‘द इलेव्हन्थ प्लेस’मध्ये रंगली दिवाळी पहाट
neha gadre marathi actress announces pregnancy
इंडस्ट्री सोडून विदेशात झाली स्थायिक; ‘ही’ मराठी अभिनेत्री लग्नानंतर ५ वर्षांनी होणार आई! बाळाच्या जन्माआधी केलं जेंडर रिव्हिल

“गुड्डी या माझ्या टोपणनावानं हाक मारली. त्यानं मला हाक मारल्यावर मी ‘ओ’ असे म्हणत मागे वळून पाहिलं. तेवढ्यात हा फटाका हातात फुटला. आपण साधारणत: चित्रपटात बॉम्ब फुटल्यावर कसं सगळं काळं वगैरे होतं. तर ते खरं आहे. कारण- सगळं काळं झालं होतं. मी त्या जागीच उभी होते. तो फटाका इतक्या जोरात फुटला होता की, माझ्या कानात एक वेगळ्या प्रकारचा आवाज येत होता. मी थरथरत होते. मला आदित्यनं अक्षरश: पाण्याच्या टाकीकडे धरून नेलं. माझ्या तोंडावर पाणी मारलं आणि मला गदागदा हलवलं. मग मी जरा नॉर्मल झाले. माझा हात सुजला होता. हत्तीएवढा झाला होता. तर हा किस्सा मला नेहमी आठवतो की, किती मूर्खासारखं मी कोणीतरी हाक मारली म्हणून मागे वळून पाहिलं होतं. तर हा किस्सा विनोदी जरी असला तरी फटाके उडवू नका. माझी सगळ्यांना विनंती आहे. आपण सर्वांनी छान ‘ग्रीन दिवाळी’ साजरी करूयात.

दरम्यान, अभिनेत्री सध्या नवरी मिळे हिटलरला या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. जहागीरदार घरातील मोठी सून म्हणून ती तिची सर्व कर्तव्ये पार पाडताना दिसते. त्यामुळे लीला वेंधळी असल्याने त्या घरासाठी योग्य नाही, असे मानून ती तिला घराबाहेर काढण्यासाठी सतत प्रयत्न करताना दिसते. सरस्वती आणि लक्ष्मी यांच्या मदतीने ती लीलाला त्रास देताना दिसते.

हेही वाचा: ठरलं! ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार हेमंत ढोमेचा नवीन चित्रपट; झळकणार ‘हे’ कलाकार, नाव अन् पोस्टर आलं समोर

आता या मालिकेत कोणते नवीन वळण येणार आहे, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असल्याचे दिसत आहेत.

Story img Loader