‘होणार सून मी या घरची’ या मालिकेला यंदा १० वर्ष पूर्ण झाली आहेत. या मालिकेत अभिनेता शशांक केतकर आणि अभिनेत्री तेजश्री प्रधान यांच्या मुख्य भूमिका होत्या. अलीकडेच ‘द केक्राफ्ट’ युट्यूब चॅनेलवर आयोजित दशकपूर्ती निमित्त गप्पांच्या कार्यक्रमात शशांकने हजेरी लावली होती. प्रसाद भारदे यांनी कलाकार, तंत्रज्ञांशी संवाद साधला. अमोल पोंक्षे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम साकारला आहे. यावेळी शशांकने ‘काहीही हं श्री’ हा डायलॉग कसा व्हायरल झाला? याबद्दलचा किस्सा सांगितला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : आलिया भट्टने लग्नात लेहेंग्याऐवजी साडी का नेसली?, अभिनेत्रीने स्वत: केला खुलासा…

‘होणार सून मी या घरची’ ही मालिका झी मराठी वाहिनीवर २०१३ ते २०१६ या दरम्यान प्रसारित केली जायची. तेजश्री आणि शशांक यांच्या मुख्य भूमिका असलेली ही मालिका प्रचंड गाजली. मालिका सुरू झाल्यापासून अल्पावधीतच श्री-जान्हवीच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. जान्हवीच्या सहा सासवा, तिचं मंगळसूत्र अगदी सगळीकडे याच मालिकेची चर्चा असायची. यामध्ये जान्हवी बऱ्याचदा ‘काहीही हं श्री’ हा डायलॉग बोलताना दिसायची. तिचा हा डायलॉग प्रचंड व्हायरल झाला होता.

हेही वाचा : समांथा प्रभू-नागा चैतन्यमध्ये पॅचअप? अभिनेत्याच्या ‘त्या’ पोस्टमुळे चर्चांना उधाण

‘काहीही हं श्री’ शशांक केतकर म्हणाला, “त्या काळात सोशल मीडियाचा वापर एवढ्या मोठ्या प्रमाणात केला जात नव्हता. पण, तरीही ‘काहीही हं श्री’ हे तीन शब्द घरोघरी लोकप्रिय झाले होते. प्रत्येक मीम्स, विनोदी पोस्टच्या खाली ‘काहीही हं श्री’ या वाक्याचा एकदा तरी उल्लेख केलेला मी पाहायचो. मालिकेवर लोकांनी प्रचंड प्रेम केलं त्यामुळे तो डायलॉग एवढा लोकप्रिय झाला. आजही त्या डायलॉगचे मीम्स आणि पोस्ट पाहून मला छान वाटतं.”

हेही वाचा : “…लोक म्हणतात की मी उद्धट आहे,” गश्मीर महाजनीची ‘ती’ पोस्ट चर्चेत

शशांकसह या पॉडकास्टमध्ये मालिकेच्या निर्मात्या सुनिला भोलाणे यादेखील सहभागी झाल्या होत्या. त्यांनी सुद्धा या मालिकेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला. “तेजश्री प्रधानला भेटणारे लोक तिला तेव्हा पैसे द्यायचे. शोमध्ये एक ट्रॅक होता जिथे जान्हवीकडे (तेजश्री प्रधान ) वडिलांच्या गुडघ्याच्या ऑपरेशनसाठी पैसे नाहीत असं दाखवण्यात आलं होतं. त्यामुळे लोकं तिला भेटून वडिलांच्या ऑपरेशनसाठी पैसे द्यायचे. या गोष्टी ऐकून आम्हाला धक्का बसायचा. त्यावेळी प्रेक्षक मालिकेशी, टीव्हीशी किती जोडले जातात हे आम्हाला कळालं.” असं निर्मात्या सुनिला यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shashank ketkar shared memories of honaar sunn me hya gharchi famous tv serial sva 00
Show comments