‘हे मन बावरे’, ‘होणार सून मी ह्या घरची’, ‘कालाय तस्मै नम:’ अशा अनेक मालिकांमधून अभिनेता शशांक केतकर घराघरांत लोकप्रिय झाला. नाटक, मालिका, चित्रपट, वेबसीरिज (ओटीटी) अशा चारही माध्यमांमध्ये त्याने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. सध्या शशांक स्टार प्रवाहच्या ‘मुरांबा’ मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे.

शशांक सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. आपल्या वैयक्तिक आयुष्यातील व शूटिंगदरम्यान येणारे विविध अनुभव तो चाहत्यांपर्यंत शेअर करत असतो. सध्या तो ‘मुरांबा’ मालिकेत प्रमुख भूमिका साकारत असून नुकत्याच शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये त्याने सेटपासून काही अंतरावर असणाऱ्या निसर्गरम्य परिसराची झलक यात दाखवली आहे. यामध्ये नेटकऱ्यांना सुमद्र, सूर्यास्त आणि नारळाच्या झाडांची झलक पाहायला मिळत आहे.

anupam kher pays tribute to dr manmohan singh
Video : “डॉ. मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिरेखेला…”; अनुपम खेर यांनी व्हिडीओ शेअर करत माजी पंतप्रधानांना वाहिली श्रद्धांजली, म्हणाले…
Hindu Sadhu History
औरंगजेबावरही मात करणाऱ्या ‘या’ हिंदू संन्याशांचा इतिहास दुर्लक्षित…
a young girl dance on a electric pole
जीवापेक्षा रील महत्त्वाची का? विजेच्या खांबावर चढून तरुणीने केला डान्स; Video होतोय व्हायरल
punha kartvya aahe
Video: “तुम्ही कितीही दूर…”, वसुंधराने केला सासूचे मन जिंकण्याचा निर्धार; ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत नवीन वळण, पाहा प्रोमो
Paaru
Video : “देवा, या जंगलात मी…”, जंगलात हरवलेल्या पारूवर संकट येणार? आदित्य पारूला वाचवू शकणार का? मालिकेत ट्विस्ट
kareena kapoor shahid kapoor photos
करीना कपूर-शाहिद कपूर बऱ्याच वर्षांनी दिसले एकाच फोटोत; नेटकरी म्हणाले, “जेव्हा तुम्ही तुमच्या एक्सला…”
Groom bride dance video on lal lal honthon pe song video goes viral on social media
“लाल लाल होटोंपर तेरा तेरा नाम” नवरदेवाचा हळदीत तुफान डान्स; VIDEO पाहून म्हणाल “आयुष्य खूप सुंदर फक्त नवरा हौशी पाहिजे”
Navri Mile Hitlarla
‘नवरी मिळे हिटलरला’मधील एजेने शेअर केला लीलाबरोबरचा व्हिडीओ; चाहत्यांच्या कमेंट्सचा पाऊस, म्हणाले, “परफेक्ट जोडी”

हेही वाचा : Pushpa 2 : भरजरी दागिने अन् साडी नेसून अवतरला अल्लू अर्जुन! टीझरमध्ये एकही संवाद नसताना ‘पुष्पा’च्या रौद्ररूपाने वेधलं लक्ष

शशांक म्हणतो, “कधी कधी आपण जग फिरतो पण आपल्या आजूबाजूचं बघायला विसरतो. ही अशीच एक जागा. गेले २ वर्ष मी या प्रायव्हेट बीज हाऊसजवळ शूट करतोय…पण, अगदी २०० पावलांवर असलेल्या या ठिकाणाहून इतका छान सूर्यास्त दिसतो हे आज अनुभवलं. थँक्यू विपुल साळुंखे…तू आज घेऊन गेलास म्हणून…नाहीतर मी, परवानगी नाहीच म्हणून पुढच्या १५० वर्षात काही गेलो नसतो.”

हेही वाचा : ‘ठरलं तर मग’ मालिकेत ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीची एन्ट्री! अर्जुन-सायलीच्या नात्यावर काय परिणाम होणार? पाहा प्रोमो

अभिनेत्याने शेअर केलेला सुंदर अन् निसर्गरम्य असा व्हिडीओ पाहून कमेंट्स सेक्शनमध्ये त्याचे चाहतेही भारावून गेले आहेत. “खूप छान निसर्गरम्य ठिकाणी सूर्यास्त बघणं किती आनंददायी”, “खरं आहे…या धकाधकीच्या जीवनात ही अशी क्षणभर विश्रांती सुद्धा खूप काही देऊन जाते”, “छानच सीन आहे, मला मालवणला गेल्यासारखे वाटले” अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी अभिनेत्याच्या व्हिडीओवर केल्या आहेत. दरम्यान, ‘मुरांबा’ ही मालिका गेली दोन वर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन करत असून यामध्ये शशांकसह अनेक लोकप्रिय कलाकार भूमिका साकारत आहेत.

Story img Loader