छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता म्हणून शशांक केतकरला ओळखलं जातो. नाटक, मालिका, चित्रपट, वेबसीरिज अशा चारही माध्यमांमध्ये त्याने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. शशांक त्याच्या दमदार अभिनयाप्रमाणेच स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखला जातो. तो सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. इन्स्टाग्रामच्या माध्यमातून तो अनेकदा सामाजिक परिस्थितीवर भाष्य करतो. शशांकने नुकताच शेअर केलेला व्हिडीओ सध्या सर्वत्र चर्चेत आला आहे.

शशांक केतकरने त्याच्या इन्स्टाग्रामवर मुंबईतील रस्त्यालगत ठेवण्यात येणाऱ्या कचरापेटीचा व्हिडीओ शेअर केला आहे. या परिसरात सर्वत्र घाणीचं साम्राज्य पाहायला मिळत आहे. याशिवाय यामध्ये पर्यावरणाला धोकादायक असणारा प्लास्टिकचा कचरा सर्वाधिक असल्याचं अभिनेत्याने त्याच्या व्हिडीओमध्ये सांगितलं आहे. तसेच या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये शशांकने आपलं मत मांडत मुंबई महानगरपालिकेला टॅग केलं आहे.

Vasai, car dealers and garages, Roads Vasai,
वसई : वाहन विक्रेते व गॅरेज वाल्यांकडून रस्ते गिळंकृत, रस्त्यावरच वाहन विक्रीचा बाजार व दुरुस्ती; वाहतुकीला अडथळे
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Aditya Thackeray and MLA Ashish Shelar
मुंबईच्या पाणी तुटवड्याला आदित्य ठाकरे जबाबदार; आमदार आशिष शेलार यांचा आरोप
Environmentalists allege that some trees were uprooted outside the Metro 3 station
‘मेट्रो ३’ स्थानकाबाहेरील काही वृक्ष उन्मळून पडल्याने पर्यावरणप्रेमींचा आरोप
Tourism to Prosperity Nifty India Tourism Index print eco news
पर्यटनातून समृद्धीकडे…:  निफ्टी इंडिया टुरिझम इंडेक्स
pcmc to construct biodiversity park in talawade says commissioner shekhar singh
पिंपरी : तळवडेत साकारणार जैवविविधता उद्यान; स्वच्छतेची कामे करणाऱ्या कंपनीला ७६ कोटींचे काम
young computer engineer died in a collision with a dumper
डंपरच्या धडकेत संगणक अभियंता तरुणाचा मृत्यू, नगर रस्त्यावर अपघात; डंपरचालक पसार
Dombivli, attempt to kill youth in Dombivli,
डोंबिवलीत तरुणाच्या अंगावर मोटार घालून फरफटत नेऊन ठार मारण्याचा प्रयत्न

हेही वाचा : सैराट झालं जी! रिंकू राजगुरू व आकाश ठोसरच्या फोटोंमुळे चर्चांना उधाण; नेटकरी म्हणाले, “आता…”

शशांक केतकर लिहितो, “रस्ते, शहर, परिसर स्वच्छ ठेवणं ही आपली आणि महानगर पालिकेची जबाबदारी आहे. जिथे या ओळी लिहिल्या आहेत, तिथेच तुटलेल्या मोडलेल्या कचऱ्याच्या २ पेट्या ठेवल्या आहेत! आपण सगळे एकत्र मिळून बदल घडवू शकतो! पण कधी? हा बदल घडवण्याची आपली खरंच इच्छा आहे का?” तसेच या पोस्टपुढे अभिनेत्याने “सत्य परिस्थिती”, “प्रदूषण”, “हे नाही चालणार”, “ये नही चलेगा” असे हॅशटॅग दिले आहेत.

हेही वाचा : शाही लग्नसोहळ्यानंतर नुपूर शिखरेची पत्नी आयरा खानसाठी रोमँटिक पोस्ट; म्हणाला, “मला तुझ्याबरोबर…”

दरम्यान, शशांक केतकरच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देत आपली मतं मांडली आहेत. अभिनेत्याच्या पोस्टवर काही युजर्सनी “मला वाटतं की, आपला कचरा आपण कचराकुंडीत टाकावा… ही सर्वस्वी आपली जबाबदारी नाही का?”, “शशांक तुझं म्हणणं अगदी योग्य आहे”, “ही खरी शोकांतिका” “हेच चालणार कारण लोक नाही सुधारणार” अशा कमेंट्स करत शशांकच्या मताला सहमती दर्शवली आहे.