अभिनेता शशांक केतकर आपल्या कामामुळे जितका चर्चेत असतो, तितकाच तो आपल्या परखड मतांमुळे असतो. शशांक नेहमी आजूबाजूच्या घडणाऱ्या घटनांबाबत आपलं स्पष्ट मत मांडत असतो. नुकताच अभिनेत्याने एक व्हिडीओ शेअर करून अस्वच्छेबाबत पुन्हा एकदा संताप व्यक्त केला आहे.

अभिनेता शशांक केतकरने यावेळी फिल्मसिटी बाहेरील अस्वच्छेबाबत परखड मत मांडलं आहे. व्हिडीओमध्ये शशांक म्हणाला, “फिल्मसिटीचा प्रवेशद्वारे कधीही मला निराश करत नाही. कचरा उचलणाऱ्या या मातेला आणि उकीरड्यावर असलेल्या या राजमातेला नमस्कार करून, वंदन करून फिल्मसिटीच्या आत जाऊ या आणि बघू या आणखी थोडा कचरा.” त्यानंतर शशांकने फिल्मसिटीमधील कचरा दाखवला आणि म्हणाला, “फिल्मसिटीतल्या ओल्या कचऱ्याच्या या पेट्या आहेत. पण, त्यात सगळं प्लॅस्टिक आहे. कदाचित या प्लॅस्टिकच्या पिशव्या ओल्या असतील.”

Navri Mile Hirlarla
Video : “आज मी सगळी गडबड…”, दु:खात असलेल्या लीलाला आली एजेची आठवण; मालिकेत येणार ट्विस्ट, पाहा प्रोमो
Rohit Patil
Rohit Patil : “अमृताहुनी गोड…”; विधानसभेत रोहित पाटलांचं…
Punha Kartvya Aahe
Video: “तू काय प्रेम करणार?”, आकाशची वसुंधरावर नाराजी; प्रेक्षकांनी केले कौतुक, म्हणाले, “तुमची जोडी…”
Salman Khan and Shah Rukh Khan attends Devendra Fadnavis Oath Ceremony
Video : मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला बॉलीवूडकरांची मांदियाळी! भर गर्दीत शाहरुख-सलमानच्या ‘त्या’ कृतीने वेधलं लक्ष
Paaru
Video : “पारू गावाकडून आलेली, कमी शिकलेली…”, आदित्यच्या बोलण्याने दुखावली पारू; नेमकं घडलं काय? पाहा प्रोमो
when abhishek Bachchan met kareena Kapoor she rolls her eyes at award show video goes viral
Video: अभिषेक बच्चन आला, करीना कपूरची गळाभेट घेतली अन् मग तिने केलं असं काही की…; व्हिडीओ होतोय व्हायरल
Muramba
Video: “आता राजा-राणीचा संसार…”, संकटावर मात करत रमा-अक्षय आले एकत्र; ‘मुरांबा’ मालिकेच्या प्रोमोवर नेटकरी म्हणाले, “कोणताच काटा…”
sidhanta mohapatra on pm narendra modi guidance
Video: “मोदींकडून इतरांशी कसं वागायचं ते शिकलो”, भाजपा खासदाराची प्रतिक्रिया चर्चेत; म्हणाले…

हेही वाचा – Video: मुहूर्त ठरला! ‘देवमाणूस’ फेम किरण गायकवाड ‘या’ दिवशी अडकणार लग्नबंधनात, मजेशीर व्हिडीओ शेअर करत तारीख केली जाहीर

पुढे शशांक म्हणाला, “कचरा बघितलात. हास्यास्पद आहे ना. मागच्या वेळेला मी फिल्मसिटीचा एक व्हिडीओ टाकला होता आणि त्या व्हिडीओनंतर मुंबई महानगरपालिकेने लगेच त्याची दखलही घेतली होती. तिथला तो परिसर स्वच्छ ही केला. पण, त्यानंतर फिल्मसिटीमध्ये १५ वेळा तरी आलो असेल. परिस्थिती जैसे थे आहेच. त्याच ठिकाणी दुसऱ्या दिवसापासून तसाच कचरा जमलेला असतो. खूप वाट पाहिली, पण काहीच फरक पडला नाही. म्हणून आजचा हा व्हिडीओ पुन्हा एकदा करतोय.”

“मुंबई महानगरपालिका तुम्हाला प्रोब्लेम लक्षात येतोय ना, प्रत्येक भागात कचऱ्याच्या पेट्या ठेवल्या आहेत, असं करून मोकळं होऊ नका. आपल्या समोरचं संकट मोठं आहे. आपली लोकसंख्या खूप आहे. त्यामुळे कचरा खूप जास्त निर्माण होणार आहे. त्यामुळे अशी खूप घाणरेडी ठिकाणं असणार आहेत. त्यामुळे इथे असे दोन-चार असे तुटलेले डब्बे ठेवण्यापेक्षा जितकी लोकसंख्या, जितका कचरा, तितक्या पेट्या आणि तितकेच प्रामाणिकपणे कचरा गोळा करण्याची ठिकाणी नेमूण द्या. मला माहितीये तुम्ही सांगाल, वरती एका पुलाचं काम सुरू आहे. बाजूला सगळीकडे काम सुरू आहेत. हे सगळं चालू आहे म्हणून आता हा कचरा ही जनता खपवून घेणार नाही. तेव्हा आवारा ते,” असं स्पष्ट शशांक केतकर म्हणाला.

हेही वाचा – Bigg Boss 18: फराह खान तजिंदर बग्गा-ईशा सिंहवर भडकली, सिद्धार्थ शुक्लाचा केला उल्लेख; नेमकं काय घडलं? जाणून घ्या

हा व्हिडीओ शेअर करत शशांक केतकरने कॅप्शनमध्ये लिहिलं, “मला कल्पना आहे की, हे एकच ठिकाण नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात असे हजारो ठिकाण आहेत जिथे कचरा जमलेला असतो. बदलाची सुरुवात ही छोट्या छोट्या कारवाईमधूनच होत असते. जर बीएमसी आणि कचरा टाकणारी जनता निर्लज्ज आहे तर मग मलाही निर्लज्जा सारखं हे पुन्हा पुन्हा निदर्शनास आणून द्यावं लागणार…मी व्हिडीओ बघणाऱ्या जनतेलाही हेच सांगेन… सहन करू नका. कचरा दिसेल तिथे व्हिडीओ शूट करून तुमच्या महानगरपालिकेला टॅग करा. निदर्शनास आणून द्या…माझं मत वाया गेलं नसेल, अजूनही देश सुधारेल …अशी आशा करतो…सगळे मिळून प्रयत्न करूया…स्वच्छ देश घडवूया.”

हेही वाचा – Bigg Boss 18: “…तर तू थेट शो बाहेर होशील”, फराह खानने रजत दलालला चांगलंच झापलं अन् दिली शेवटची ताकीद, म्हणाली, “तू स्वतःला…”

दरम्यान, शशांक केतकरच्या या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. “कटू सत्य आहे”, “शशांक तुझा अभिमान वाटतो”, “सर्वांनी आवाज उठवायला हवा”, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांच्या उमटल्या आहेत.

Story img Loader