अभिनेता शशांक केतकर हा मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. तो कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असतो. तो नेहमी सोशल मीडियावर अनेक पोस्ट शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतो. सध्या तो ‘मुरांबा’ या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे. नुकताच शशांकने त्याचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
Video: भर उन्हात शेतात राबतेय मराठमोळी अभिनेत्री; व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “कोणताच राजकारणी…”
शशांक केतकरने हातात कप घेतलेला एक फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. लाल रंगाचं घर्ट घातलेला शशांक या फोटोत छान दिसत आहे. त्याच्या या फोटोवर चाहते लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. पण यावरील एका खास कमेंटने लक्ष वेधून घेतलं. ही कमेंट आहे शशांकची पत्नी प्रियंकाची. होय, तिने पती शशांकच्या फोटोवर ‘आईच्या गावात! एक नंबर!’ अशी कमेंट कर हार्ट व फायरचे इमोजी टाकले आहेत.
प्रियंकाच्या या कमेंटवर शशांकने रेड हार्ट इमोजी पोस्ट करत रिप्लाय दिला आहे. त्याच्या या फोटोवर चाहत्यांच्याही कमेंट्स आहेत. ‘नेहमीप्रमाणेच आजच्याही फोटोत खूपच छान दिसतोय,’ अशा कमेंट्ससह हार्ट इमोजीचा वर्षाव शशांकच्या फोटोवर होताना दिसत आहेत.