अभिनेत्री तुनिषा शर्माने २४ डिसेंबरला शूटिंग सुरू असतानाच सेटवर गळफास लावून आत्महत्या केली. तुनिषाच्या अचानक जाण्याने तिच्या कुटुंबियांना धक्का बसला आहे. तुनिषाने वयाच्या १४व्या वर्षी वडिलांना गमावलं होतं. तुनिषाच्या आत्महत्येप्रकरणी तिची आई वनिता शर्मा यांनी तिचा सहकलाकार शिझान खानवर आरोप केले होते. शिझानने ब्रेक-अप केल्याने ती नैराश्यात होती, असंही त्या म्हणाल्या होत्या.

वनिता शर्मांच्या तक्रारीनंतर शिझान खानला अटक करण्यात आली, त्याला कोर्टासमोर हजर करण्यात आलं व कोर्टाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस तुनिषाच्या मृत्यूप्रकरणी शिझानची कसून चौकशी करत आहेत. शिझानच्या कुटुंबीयांनी तुनिषाच्या कुटुंबाचे आरोप फेटाळले असून तो निर्दोष असल्याचं म्हटलंय. आता पुन्हा वनिता शर्मा यांनी शिझानविरोधात संताप व्यक्त केला आहे. “शिझान आधी तुनिषाबरोबर नात्यात आला, त्याने लग्नाचे आश्वासन दिले आणि नंतर तिचा विश्वासघात केला. शिझानने माझ्या मुलीचा ३-४ महिने वापर केला”, असा आरोप तुनिषाच्या आईने केला आहे.

Govinda father in law refused to attend his wedding with Sunita Ahuja
“माझे आजोबा श्रीमंत, तर वडील…”, गोविंदाच्या लेकीचं वक्तव्य; म्हणाली, “माझी आई शॉर्ट्स घालायची…”
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Kapil Sharma wanted to beat KRK honey singh
“कपिल शर्मा अभिनेत्याला मारायला गेलेला, त्याच्या दुबईतील घरात काच फोडली, हनी सिंगने त्याचे केस ओढले”
prathamesh parab regret for not getting enough screens
“महाराष्ट्रात स्क्रिन्स मिळत नाहीयेत यापेक्षा दुर्दैव…”, प्रथमेश परबने व्यक्त केली खंत; म्हणाला, “मायबाप प्रेक्षकांपर्यंत…”
Vishal Gawli News
Vishal Gawli : “विशाल गवळीने माझ्या मुलीला जवळ ओढलं, तिचं तोंड दाबलं आणि…”, पीडितेच्या आईने सांगितला दोन वर्षांपूर्वीचा ‘तो’ प्रसंंग
Pratap Sarnaik and vinod kambli
Vinod Kambli : “तुझा लिव्हर एकदम फ्रेश, बायकोशी किती भांडतोस”, सरनाईक यांचा विनोद कांबळीबरोबरचा मिश्किल संवाद व्हायरल!
Paaru
Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष
mohan bhagwat in disputed religious land
Mohan Bhagwat: मोहन भागवतांच्या भूमिकेशी ‘दी ऑर्गनायझर’ची फारकत; म्हणे, “वादग्रस्त धार्मिक स्थळांचं सत्य समोर आलंच पाहिजे!”

“शिझानने तुनिषाची फसवणूक केली होती, तुनिषाबरोबर असताना त्याने दुसऱ्या मुलीशी संबंध ठेवले होते, त्याने माझ्या मुलीची फसवणूक केली होती. त्यामुळे शिझानला सोडू नये, त्याला शिक्षा झालीच पाहिजे”, असा आक्रोश वनिता शर्मा यांनी केला आहे.

दरम्यान, तुनिषाच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलंय. त्यात तिला मृत्यू जीव गुदमरल्यामुळे झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. जेव्हा तुनिषाने गळफास घेतला, तेव्हा शिझान शूटिंग करत होता, अशीही बाब समोर आली आहे. शिझानने आपल्यावरील आरोप नाकारल्याचं कळतंय.

Story img Loader